मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू, 3 दिवसात 3 पोलिसांच्या मृत्यूने खळबळ

कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलीस कर्मचारी देखील कोरोनाचे बळी ठरत आहेत (Police constable death in Mumbai due to corona).

मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू, 3 दिवसात 3 पोलिसांच्या मृत्यूने खळबळ
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 7:07 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलीस कर्मचारी देखील कोरोनाचे बळी ठरत आहेत (Police constable death in Mumbai due to corona). मुंबईत कोरोना संसर्गामुळे आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. ते कुर्ला ट्रॅफिकमध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते. मागील 3 दिवसात कोरोनामुळे 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे.

दरम्यान याआधी मुंबई पोलिस दलातील 2 हवालदारांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला होता. सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व पोलीस कर्मचारी 50 वर्षे वयापेक्षा जास्त वयाचे होते.  दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी मृत्यू झालेल्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा केली होती.

‘दुर्दैवाने मुंबई पोलिसांच्या दोघा कर्मचाऱ्यांनी कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या युद्धात बलिदान दिले. सरकार दोन्ही कुटुंबियांसोबत आहे. दोन्ही परिवारांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल. आम्ही त्यांना आवश्यक ते सर्व देऊ’ असं अनिल देशमुख म्हणाले होते.

गेल्या दोन दिवसात मुंबई पोलिस दलातील दोन पोलिसांचा बळी गेला. मुंबई पोलिस दलातील 52 वर्षीय हवालदाराचा आज (26 एप्रिल) कोरोनामुळे मृत्यू झाला. तर काल (25 एप्रिल) 57 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबललाही कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. संबंधित कर्मचारी वाकोला पोलिस ठाण्यात कार्यरत होता, तर वरळीचा रहिवासी होता.

हेही वाचा : ‘कोरोना’ लढ्यातील महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच, अजित पवारांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात आतापर्यंत 107 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 17 अधिकाऱ्यांचा, तर 90 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गृह मंत्रालयातील अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. आतापर्यंत सात पोलिस कोरोनामुक्त झाले, ही दिलासादायक बाब आहे.

वर्षा बंगल्यावरील महिला पोलिसाला कोरोना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं मागील आठवड्यात समोर आलं होतं.

संबंधित बातम्या : 

मुंबई पोलिसातील कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू, कोरोनाचा वाढता कहर

‘मातोश्री’च्या अंगणातील चहावाल्याची कोरोनावर मात, ठाकरे परिवाराचे आभार

Police constable death in Mumbai due to corona

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.