'मातोश्री'च्या अंगणातील चहावाल्याची कोरोनावर मात, ठाकरे परिवाराचे आभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'च्या अंगणातील चहावाल्याने (Tea vendor win fight on corona) कोरोनावर मात केली आहे.

'मातोश्री'च्या अंगणातील चहावाल्याची कोरोनावर मात, ठाकरे परिवाराचे आभार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या अंगणातील चहावाल्याने (Tea vendor win fight on corona) कोरोनावर मात केली आहे. या चहावाल्याला 19 एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता त्याची प्रकृती पूर्णपणे बरी झाली आहे. या चहावाल्याने ‘टीव्ही 9 मराठी’ला आपला अनुभव सांगितला. यावेळी त्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांचे स्वीय सचिव विनोद ठाकूर यांचे आभार मानले (Tea vendor win fight on corona).

या चहा विक्रेत्याची 1 एप्रिल रोजी प्रकृती बिघडली होती. त्याला सर्दी, खोकला आणि ताप आला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे स्वीय सचिव विनोद ठाकूर यांनी या चहावाल्याला तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्यावर उपचार झाले. अखेर दोन आठवड्यात या चहावाल्याने कोरोनावर मात केली. त्यामुळे या चहावाल्याने ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ठाकरे परिवार आणि विनोद ठाकूर यांचे विशेष आभार मानले.

“रुग्णालयात माझ्यावर खूप चांगल्याप्रकारे उपचार करण्यात आला आणि माझा जीव वाचला. त्यामुळे सर्व डॉक्टर, नर्स आणि ठाकरे कुंटुंबाचा मी मनापासून आभारी आहे. या आजारावर चांगल्याप्रकारे उपचार होत आहेत. आजारावर मात करुन लोक घरीदेखील जात आहेत. त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छितो की, घाबरु नका. फक्त स्वत:ची काळजी घ्या”, असं आवाहन चहावाल्याने केलं.

चहावाल्याकडे गेलेल्या काही पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आलं होतं. जवळपास 150 पोलिस आणि एसआरपीएफच्या जवानांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले टाकली गेली. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचीदेखील चाचणी करण्यात आली आहे. या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, या सर्वांना राहत्या घरी दोन आठवडे होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे.

या चहावाल्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन तातडीने कामाला लागलं होतं. ‘मातोश्री’पासून हाकेच्या अंतरावर त्याची चहाची टपरी होती. टपरीचा आजूबाजूच्या संपूर्ण भागात प्रवेश मनाई करण्यात आली होती. ‘मातोश्री’च्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला परिसर मुंबई महापालिकेने निर्जंतुक केला होता.

संबंधित बातमी :

उद्धव ठाकरे फोटोग्राफर, संपादक आणि कलाकार, राज्यपालांना निर्णय घ्यावाच लागेल : छगन भुजबळ

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षण कायम, सुप्रीम कोर्टाचा स्थगितीस नकार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *