AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे फोटोग्राफर, संपादक आणि कलाकार, राज्यपालांना निर्णय घ्यावाच लागेल : छगन भुजबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित राज्यपाल नियुक्त आमदारकीवरुन (Chhagan Bhujbal on Governor nomination MLC ) उठलेल्या वादावर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे फोटोग्राफर, संपादक आणि कलाकार, राज्यपालांना निर्णय घ्यावाच लागेल : छगन भुजबळ
| Updated on: Apr 25, 2020 | 2:15 PM
Share

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित राज्यपाल नियुक्त आमदारकीवरुन (Chhagan Bhujbal on Governor nomination MLC ) उठलेल्या वादावर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरे हे फोटोग्राफर, सामनाचे संपादक, आणि एक कलाकार असल्यानं, त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त करण्यास राज्यपालांना कोणतीही अडचण नाही. त्यांना निर्णय घ्यावाच लागेल” असं छगन भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.  (Chhagan Bhujbal on Governor nomination MLC )

राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. मात्र राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. शिवाय भाजपनेही मंत्रिमंडळ निर्णयाला आक्षेप घेत, उद्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होऊ शकत नाहीत, असं म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांकडे बोट दाखवत, राज्यपाल निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं म्हटलं आहे. छगन भुजबळांनीही राज्यपालांना निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणत आपली बाजू मांडली.

“राज्यपाल अशा पद्धतीने कोणाची अडवणूक करु शकत नाहीत. उद्धव ठाकरे हे व्यंगचित्रकार , फोटोग्राफर, संपादक आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सगळ्या नियमात उद्धव ठाकरे बसत आहेत. कोरोनाच्या संकटात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये”, असं छगन भुजबळ म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचा दावा

“उद्धवजींच्या विधानपरिषदेचा प्रस्ताव राज्यपालांकडे असून ते निर्णय घेतील. मात्र महाविकास आघाडीतील काहींना राज्यपालांनी हा प्रस्ताव मान्य करु नये, असं वाटतंय. उद्धवजींनी आमदार होऊ नये म्हणजे त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असं काहींना वाटत आहे” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी पुण्यात केला होता.

‘राज्यपाल कोट्यातून आमदार होऊ शकत नाहीत’

“राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यास आमचा विरोध नाही (Chandrakant Patil on CM Uddhav Thackeray). त्याची घटनात्मक चर्चा व्हायची ती होईल. मात्र ते शक्यच नाही. घटनात्मकदृष्ट्या तसं होऊ शकत नाहीत”, असंही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काही दिवसापूर्वी म्हणाले होते.

संबंधित बातम्या  

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्याचीच चाल, चंद्रकांत पाटलांचा दावा 

राज्य कोरोनाशी लढतंय, भाजपला राजकारणाचं पडलंय, रोहित पवार संतापले 

मुख्यमंत्री राज्यपाल कोट्यातून आमदार होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट

आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का? : चंद्रकांत पाटलांचा सवाल  

मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत दादांनी पुढाकार घ्यावा : संजय काकडे

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.