AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत दादांनी पुढाकार घ्यावा : संजय काकडे

भाजपचे राज्यसभा सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी स्वपक्षीय नेत्यांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धल ठाकरे यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत दादांनी पुढाकार घ्यावा : संजय काकडे
| Updated on: Apr 19, 2020 | 1:34 PM
Share

पुणे : उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद (CM Uddhav Thackeray) राहणार की, जाणार याची महाराष्ट्रात सध्या (Sanjay Kakde Appeal To Governor) सर्वदूर खूप चर्चा आहे. मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली नाही तर, महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही, असे रोखठोक मत माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde Appeal To Governor) यांनी व्यक्त केले.

शिवाय, यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुढाकार घ्यावा. याबरोबरच राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या चुका काढण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, असेही खासदार काकडे म्हणाले. भाजपचे राज्यसभा सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी स्वपक्षीय नेत्यांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धल ठाकरे यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस मंत्रिमंडळाने केली. त्याला 13 दिवस होऊनही राज्यपालांनी याविषयी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना ठराविक कालावधीत विधिमंडळाचे सदस्य होण्यात पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. असे होणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही (Sanjay Kakde Appeal To Governor).

त्यामुळे याप्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यपालांशी चर्चा करून उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य बनण्याचा पेच सोडवावा. असं झालं तर, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात ही गोष्ट सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल आणि जर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी विधानपरिषदेवर नियुक्त न केल्यास महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी क्षत्रियासारखी विरोधकाची भूमिका बजवावी, असेही माजी खासदार काकडे म्हणाले. तर राज्यपालांनी राजकीय कटुता सूडबुद्धीने न ठेवता दोन दिवसात प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

जगाच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाचा फैलाव कमी झाला आहे. याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावे लागेल. देशात पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला. महाराष्ट्राबरोबरच देशात कोरोनामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. जीवितहानीसह आर्थिक नुकसान होत असताना विरोधी पक्षांनी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहकार्य केले पाहिजे. ही आपली खरी संस्कृती असल्याचे माजी खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

संजय राऊतांचं ट्विट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत अप्रत्यक्षरित्या राज्यपालांवर निशाणा साधला. “राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!”, असं ट्विट संजय राऊतांनी केलं.

Sanjay Kakde Appeal To Governor

संबंधित बातम्या :

चिंता नको, तुम्ही माझ्या महाराष्ट्रात सुरक्षित आहात, मुख्यमंत्र्यांचा मजुरांना शब्द

मी गिरणी कामगाराचा मुलगा, रणांगणात उतरलो तर महागात पडेल, चंद्रकांत पाटलांचा विश्वजीत कदमांना इशारा

Corona | उद्धव ठाकरे सरकार फेल, महाराष्ट्रात लष्कर बोलवा : नारायण राणे

जो शिशों के घरो मे रहते है… जयंत पाटील-चंद्रकांतदादांच्या वादात विश्वजित कदमांची उडी

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.