मी गिरणी कामगाराचा मुलगा, रणांगणात उतरलो तर महागात पडेल, चंद्रकांत पाटलांचा विश्वजीत कदमांना इशारा

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात रंगलेल्या वाक-युद्धात कॉंग्रेस आमदार आणि कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम उडी घेतली होती. कदमांनी केलेल्या टीकेला चंद्रकांच पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Chandrakant Patil slams Vishwajit Kadam).

मी गिरणी कामगाराचा मुलगा, रणांगणात उतरलो तर महागात पडेल, चंद्रकांत पाटलांचा विश्वजीत कदमांना इशारा

मुंबई :विश्वजित कदम यांना मी सांगू इच्छितो मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे (Chandrakant Patil slams Vishwajit Kadam). मी रणांगणात उतरलो तर त्यांना महागात पडेल. ते स्वतः काचेच्या घरात राहतात. त्यांच्या संस्था या गायराणावर आहेत. मला ते काढायला लावू नका”, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात रंगलेल्या वाक-युद्धात काँग्रेस आमदार आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम उडी घेतली होती. कदमांनी केलेल्या टीकेला चंद्रकांच पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Chandrakant Patil slams Vishwajit Kadam).

‘जो शिशों के घरो मे रहते है, वो दुसरोंके घरो पे पत्थर फेका नही करते. महापुराच्या काळात भाजप नेत्यांनी जनतेला काय मदत केली, हे सर्वांना माहित आहे. चंद्रकांतदादांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणं चुकीचे आहे. ‘कोरोना’च्या संकटात कोणीही राजकारण करु नये”, अशी टीका कदम यांनी केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी काचेच्या धमक्या कुणाला देता? असा सवाल कदम यांना विचारला आहे.

“माझ्यावर टीका टिप्पणी करण्यापूर्वी विश्वजीत कदम यांनी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी करावी. सांगलीत पूर आला त्यावेळी आपण काय केले? संपूर्ण देश आणि राज्य कोरोनाच्या महाभयानक स्थितीचा सामना करत असताना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम सांगलीत काय करत आहेत? याचं त्यांनी उत्तर द्यावं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“संकटकाळी भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन कदम यांची हकालपट्टी करण्यात यावी”, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. “लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या विश्वजीत कदम यांना सांगलीच्या पुराची चौकशी करण्याचा नैतिक अधिकार नाही”, असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला.

“कोरोनाच्या साथीमध्ये भाजपा सत्तेत नसूनही जनतेच्या मदतीला धावून गेला आहे. पक्षातर्फे राज्यातील 46 लाख लोकांच्या भोजन व्यवस्थेसह शिधा देण्यात आला आहे. अन्य मदतीची आकडेवारी मोठी आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला. त्यावेळी आम्ही काय‌ केलं याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. पूराचा फटका बसलेल्या चार लाख 70 हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आणि पंधरा दिवस त्यांच्या भोजनाची आणि निवाऱ्यांची व्यवस्था केली. त्या लोकांना रोज 60 रुपये निर्वाह भत्ताही दिला. आसरा घेतलेले लोक परत आपल्या घरी जाण्यास निघाले, त्यावेळी त्यांना भांडीकुंडी आणि कपड्यांसाठी 15 हजार रुपये दिले. तसेच सहा महिन्यांचे रेशनही दिले. दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले”, असंदेखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “दादा, कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरू नका. स्वतःची काळजी घ्या”, असं म्हणत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना चिमटे काढले होते. यावर “जयंत पाटलांनी मला सल्ला देण्यापेक्षा आपल्या नेत्याला द्यावा, त्यांचे वय माझ्यापेक्षा जास्त आहे”, असा टोला लगावला.

संबंधित बातम्या : 

जो शिशों के घरो मे रहते है… जयंत पाटील-चंद्रकांतदादांच्या वादात विश्वजित कदमांची उडी

देशात कोरोनाचं भयंकर संकट, पण चंद्रकांतदादांना सत्ता गेल्याचं दु:ख : राजू वाघमारे

‘दादा, कोरोनाचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका, काळजी घ्या’, जयंत पाटलांचा टोला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI