स्पेशल रिपोर्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके आमदार कसे होणार?

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीबाबत निर्णय घेतलेला (CM Uddhav Thackeray Vidhan Parishad MLA) नाही.

स्पेशल रिपोर्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके आमदार कसे होणार?

मुंबई : ‘कोरोना’ संकटामुळे विधानपरिषद निवडणूक लांबणीवर (CM Uddhav Thackeray Vidhan Parishad MLA) पडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात आलं आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

राज्यपाल कोट्यातून घटनात्मकदृष्ट्या उद्धव ठाकरे आमदार होऊच (CM Uddhav Thackeray Vidhan Parishad MLA) शकत नाही, असं काही दिवसांआधीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तर दुसरीकडे अजून तरी मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही.

उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करावी, अशी शिफारस 6 एप्रिलला राज्यपालांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल आता यावर कायदेशीर सल्ला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

याआधी मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या 2 नियुक्त्या राज्यपालांनी फेटाळल्या आहेत. या फेटाळलेल्या 2 जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरेंची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे जरी नेमणूक केली तरी ही नेमणूक ही मूळ सदस्याच्या कालावधीपुरतीच असेल. त्यामुळे सर्व 12 सदस्यांची एकदाच नियुक्ती व्हावी, असं राज्यपालांचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र, जर राज्यपालांनी निर्णय घेतला नाही तर उद्धव ठाकरेंसमोर नेमके पर्याय काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

तसेच येत्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीबाबत निर्णय घेतला गेला नाही, तर राज्यपालांना शिफारस स्वीकारण्याबद्दल पुन्हा विनंती करावी लागेल. अन्यथा 3 मेनंतर लॉकडाऊन संपल्यानंतर लगेचच निवडणूक घेता येऊ शकते.

मात्र निवडणूक घेण्यासाठी किमान 12 दिवस हवे. त्यामुळे लॉकडाऊननंतर 4 ते 27 मे असा 24 दिवसांचा कालावधी मिळतो.

उद्धव ठाकरे यांना 27 मे रोजी मुख्यमंत्री होऊन 6 महिने पूर्ण होतील. त्याआधी आमदारकी मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळं राज्यपाल कोणता निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार (CM Uddhav Thackeray Vidhan Parishad MLA) आहे.


Published On - 11:24 pm, Fri, 17 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI