AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harshvardhan Sapkal:… मग कोश्यारी, सावरकरांचे पुतळे जाळणार का? हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा डिवचलं, पुण्यातील राड्यावर थेट प्रत्युत्तर

Harshvardhan Sapkal criticized BJP over Tipu Sultan Controversy: टिपू सुलतानवरून राज्यात राजकारण चांगलंच पेटलं. पुण्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये राडा झाला. दगडफेक झाली. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहेत. तर पुण्यातील राड्यावरही त्यांनी थेट प्रत्युत्तर दिले.

Harshvardhan Sapkal:... मग कोश्यारी, सावरकरांचे पुतळे जाळणार का? हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा डिवचलं, पुण्यातील राड्यावर थेट प्रत्युत्तर
हर्षवर्धन सपकाळ, टिपू सुलतानImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 15, 2026 | 3:18 PM
Share

Harshvardhan Sapkal criticized BJP: टिपू सुलतानवरून राज्यात अचानक राजकारणाला आणि वादाला उकळी फुटली. काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठा राडा झाला. राज्यात विविध ठिकाणी आंदोलन झालीत. काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आली. त्यातच वर्धा येथे माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला पुन्हा डिवचले. काल त्यांनी छत्रपती शिवराय आणि टिपू यांचे कार्य समकक्ष असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यात काहूर उठले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली. तर सपकाळांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली.

कोश्यारी-सावरकरांचा पुतळा जाळणार का?

काँग्रेस आणि भाजपमध्ये पुण्यात तुफान राडा झाला. त्याचवेळी वर्धा येथे माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते करत असताना शिवाजी महाराज यायला आणि कावळा बसायला आणि डांग तुटायला असं जे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यासोबत शिवाजी महाराजांचा संदर्भात अधिक जे चुकीचे सावरकरांनी व्यक्त केले होते. त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जळणार आहे का हाही माझा प्रश्न आहे. कोश्यारी हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे देखील पुतळे जाणार आहात का ते हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे, असे वक्तव्य सपकाळांनी केले. त्यावरून पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्विट चर्चेत

दरम्यान पुण्यातील भाजप-काँग्रेस राड्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. माझ्या वक्तव्याची मोडतोड करून “ध” चा “मा” करून देवेंद्र फडणविसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असे मी सांगितले होते, त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला, असे वक्तव्य सपकाळ यांनी केले.

पुण्यातील भाजपचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. भाजपच्या या गुंडगिरीचा आम्हा तीव्र निषेध करतो. पुणे पोलिसांनी दंगेखोर भाजप गुंडाना चिथावणी देणाऱ्या धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपच्या दंगेखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात