AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | उद्धव ठाकरे सरकार फेल, महाराष्ट्रात लष्कर बोलवा : नारायण राणे

महाराष्ट्रातील मृतांची संख्या वाढतेय याची चीड येतेय, अन्य राज्यांनी त्यावर नियंत्रण मिळवलं, मग प्रगत महाराष्ट्राला का जमत नाही? हे सरकार सपशेल फेल आहे, असा हल्लाबोल नारायण राणेंनी केला (Narayan Rane slams Thackeray sarkar).

Corona | उद्धव ठाकरे सरकार फेल, महाराष्ट्रात लष्कर बोलवा : नारायण राणे
| Updated on: Apr 16, 2020 | 3:40 PM
Share

मुंबई : भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane slams Thackeray sarkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर सडकून टीका केली. “महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा 3 हजाराच्या वर गेला आहे, रुग्ण वाढ आणि मृत्यूला हे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत”, असं नारायण राणे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते (Narayan Rane slams Thackeray sarkar).

महाराष्ट्रातील मृतांची संख्या वाढतेय याची चीड येतेय, अन्य राज्यांनी त्यावर नियंत्रण मिळवलं, मग प्रगत महाराष्ट्राला का जमत नाही? हे सरकार सपशेल फेल आहे, असा हल्लाबोल नारायण राणेंनी केला.

धारावीसारख्या ठिकाणी ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्या महाराष्ट्र सरकारने केल्या नाहीत, केरळ, राजस्थानमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात झालं नाही, तशी खबरदारी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये घेतली नाही, असं नारायण राणे म्हणाले.

महाराष्ट्रात तीन पक्षांचं हे सरकार आहे, या सरकारचं कौतुक कशाबद्दल करायचं? बाकीच्या राज्यातील आकडे बघा आणि महाराष्ट्रातील कोरोनाचे आकडे बघा. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना विनंती करतो की महाराष्ट्रात तातडीने लष्कर पाचारण करा, असं नारायण राणे यांनी नमूद केलं.

मजुरांची गर्दी का होते? वांद्र्यात जमावबंदी नाही का? पोलिसांनी गर्दी जमू कशी दिली? सरकारचं हे अपयश आहे, सरकारमध्ये ताळमेळ नाही, सोशल मीडियावर सरकारचं कौतुक करायला लावलं जात आहे , असा आरोप नारायण राणे यांनी केला.

महाराष्ट्रातील उद्योगांची अवस्था काय आहे? महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र होतं त्याला अधोगतीकडे नेण्यासाठी हे कोरोनाचं संकट आणि त्याला रोखण्यात अपयशी ठरलेलं हे महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असाही आरोप नारायण राणे यांनी केला.

मजुर गावी का जात आहेत? त्यांना अन्न-पाणी दिलं जात नाही, हाताला काम नाही, त्यांची उपासमार होतेय म्हणून ते गावी चाललेत, महाराष्ट्रात त्यांची उपासमार होतेय, बांद्र्यात जिथे हे लोक जमले तिथून मुख्यमंत्री पाच मिनिटाच्या अंतरावर राहतात. वांद्र्यात जमावबंदी नाही का? हे सरकारचं अपयश आहे, असाही हल्ला राणेंनी चढवला.

सरकारने काही उपाययोजना केल्या नाहीत, फक्त घोषणा केल्या. त्याची अंमलबजावणी होत नाही, लोकांपर्यंत काही पोहोचत नाही, सर्व्हे करुन माहिती गोळा करा, रुग्णालयांची तर अवस्था वाईट आहे, असा दावा राणेंनी केला.

आदित्य ठाकरेंवर निशाणा

नाचता येईन अंगण वाकडं, असं आदित्य ठाकरेंचं झालंय, यांना काही करता येईना आणि हे केंद्रावर ढकलत आहेत, केंद्राकडे एका बाजूला मदत मागतात आणि दुसऱ्या बाजूला टीका करतात, केंद्रावर टीका करण्याइतकं यांचं मोठं पद नाही, असा निशाणा, राणेंनी आदित्य ठाकरेंवर चढवला.

सगळं केंद्राने करायचं का? मग राज्याने फक्त पदं उपभोगायची का? त्यांनी स्वत: काहीतरी करावं, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रातील मृतांची संख्या वाढतेय याची चीड येतेय, अन्य राज्यांनी त्यावर नियंत्रण मिळवलं, मग प्रगत महाराष्ट्राला का जमत नाही? हे सरकार सपशेल फेल आहे, असा हल्लाबोल राणेंनी केला.

लष्कराला पाचारण करा

महाराष्ट्रात लष्कराला पाचारण करणं, होमगार्डला मदतीला घेणं आवश्यक आहे, ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत तिथे उद्योगधंदे सुरु करावेत, अर्थव्यवस्थेवर लक्ष द्यावं, कोरोनावर कशी मात करावी यासाठी विचारवंतांची मदत घ्यावी, असे पर्याय राणेंनी सूचवले.

महाराष्ट्रातील जनतेला विनंती, पंतप्रधान मोदींनी आवाहन केलंय लॉकडाऊन पाळा, त्याला साथ द्या, घरीच राहा, कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करा, महाराष्ट्रातील जनता राष्ट्रीय संकटावेळी एकजूट दाखवते, यावेळीही दाखवा, असं आवाहन राणेंनी केलं.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधित तीन हजारांच्या पार, मुंबईतच 2003 रुग्ण

Corona : औरंगाबादेत एका गर्भवती महिलेसह तिघांना करोना, आकडा 28 वर

टीव्ही 9 इम्पॅक्ट : एपीएमसी मार्केट कामगार, व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट घ्या, एकनाथ शिंदेंचे आदेश

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.