कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार मोफत : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व चाचण्या आणि उपचार (Corona Virus Treatment Free) मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार मोफत : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
Follow us
| Updated on: Apr 25, 2020 | 11:24 AM

लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व चाचण्या आणि उपचार (Corona Virus Treatment Free) मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय, दंत महाविद्यालयांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये कोरोनावरील उपचार निशुल्क करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्यात कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Corona Virus Treatment Free) आहे. हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांच्या सर्व तपासण्या आणि उपचार यापुढे निशुल्क करण्यात येणार आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत. यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

कोविड-19 ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात, असे अनेक प्रकार घडले आहेत. या निर्णयामुळे जास्तीत जास्त रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील. त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार आहे. तसेच कोविड-19 ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले.

राज्यातील स्थिती काय?

महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे. काल (24 एप्रिल) दिवसभरात एकूण 394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 117 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यभरात 957 रुग्ण बरे झाले आहेत. तर, एकूण 5 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत महाराष्ट्रात 1 लाख 2 हजार 189 कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले, तर 6 हजार 817 जण पॉझिटिव्ह आले (Aurangabad Corona Update) आहेत.

संबंधित बातम्या : 

पुण्याची धाकधूक वाढली, दोन दिवसात 208 नवे कोरोना रुग्ण आणि 8 मृत्यू

वाशिम जिल्हा कोरोनामुक्त, जिल्ह्यातील एकमेव रुग्ण कोरोना निगेटिव्ह

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.