Yavatmal Corona Update : काल 27, आज 19, यवतमाळमध्ये तीन दिवसात 55 रुग्ण, बाधितांची संख्या 79 वर

यवतमाळमध्ये आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं आहे. आज दिवसभरात यवतमाळमध्ये कोरोनाचे 19 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Yavatmal Corona Update : काल 27, आज 19, यवतमाळमध्ये तीन दिवसात 55 रुग्ण, बाधितांची संख्या 79 वर
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 7:58 PM

यवतमाळ : राज्यात कोरोना विषाणूची लागण होणाऱ्यांची संख्या (Yawatmal Corona Patients) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यवतमाळमध्येही कोरोनाचा विळखा वाढत आहे. यवतमाळमध्ये आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं आहे. आज दिवसभरात यवतमाळमध्ये कोरोनाचे 19 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही 79 वर (Yawatmal Corona Patients) पोहोचली आहे.

गेल्या तीन दिवसात यवतमाळमधील कोरोना रुग्णांमध्ये 55 नी वाढ झाली आहे. हा आकडा प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढतच आहे. रविवारी 60 पर्यंत असलेला हा आकडा आज 79 वर पोहोचला. रविवारी मध्यरात्रीनंतर 5 जणांचे, सोमवारी सकाळी 6 जणांचे तर संध्याकाळपर्यंत 8 जण असे एकूण संपूर्ण दिवसभरात 19 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तर आयसोलेशन वॉर्डात एकूण 305 जण भरती (Yawatmal Corona Patients) आहेत.

आयसोलेशन वॉर्डात आज तीन जण नव्याने भरती झाले आहेत. नागपूरला तपासणीकरिता पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या एकूण 32 असून सद्यस्थितीत 102 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली.

जीवनावश्यक वस्तुंसाठी तीन तासांची मुभा

तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतर यवतमाळ शहरात मंगळवारी आणि बुधवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, किराणा, भाजीपाला, दुध, फळे आदी केवळ दिलेल्या वेळेतच सुरु राहतील. बाजार समितीची ठोक भाजीमंडी मात्र बंद राहणार आहे. तसेच, घरोघरी भाजीचे हातठेले फिरविण्यास मुभा राहील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले (Yawatmal Corona Patients) आहे.

संबंधित बातम्या : 

देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 22.17 टक्क्यांवर, 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 131 वर, कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुंबातील 9 जणांचा समावेश

Pune Corona | आणखी चार अधिकारी दिमतीला, अजित पवारांचा निर्णय, पुणे कोरोनाविरुद्ध लढाईचं नियोजन

Plasma Therapy : कोरोनामुक्त झालेल्या तब्लिगीकडून प्लाझ्मा डोनेट, मुंबईकर तब्लिगीला पहिला मान

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.