मिशन मंगल : 200 कोटी क्लबमध्ये अक्षयचा पहिला सिनेमा, सलमानचाही रेकॉर्ड तोडला

अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' सिनेमा प्रदर्शित होऊन आता चार आठवडे झाले आहेत (Mission Mangal). मात्र, 'मिशन मंगल' अजूनही प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत ओढून आणण्यात यशस्वी ठरतो आहे. या सिनेमाने भारतात आतापर्यंत 200.16 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे

मिशन मंगल : 200 कोटी क्लबमध्ये अक्षयचा पहिला सिनेमा, सलमानचाही रेकॉर्ड तोडला
Nupur Chilkulwar

|

Sep 13, 2019 | 3:02 PM

मुंबई : अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘मिशन मंगल’ सिनेमा प्रदर्शित होऊन आता चार आठवडे झाले आहेत (Mission Mangal). मात्र, ‘मिशन मंगल’ अजूनही प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत आणण्यात यशस्वी ठरतो आहे. या सिनेमाने भारतात आतापर्यंत 200.16 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे (Mission Mangal in 200 Cr club). त्यासोबतच ‘मिशन मंगल’ हा सिनेमा 200 कोटी क्लबमध्ये आला आहे. 200 कोटी कमवून 200 कोटी क्लबमध्ये येणारा हा अक्षय कुमारचा पहिलाच सिनेमा आहे.

सिनेसमीक्षक तरण आदर्शने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. “मिशन मंगलने 200 कोटीचा आकडा पार केला. ही अक्षय कुमारची पहिली डबल सेंचुरी आहे. मिशन मंगलने चौथ्या आठवड्यात शुक्रवारी 73 लाख, शनिवारी 1.40 कोटी, रविवारी 2.10 कोटी, सोमवारी 61 लाख, मंगळवारी 1.01 कोटी, बुधवारी 54 लाख, गुरुवारी 63 लाख रुपये कमावले. मिशन मंगलने तीन दिवसांमध्ये 50 कोटी, पाच दिवसात 100 कोटी, 11 दिवसात 150 कोटी आणि 29 दिवसात 200 कोटी कमवून अक्षय कुमारला त्याचा सर्वात मोठा हीट सिनेमा दिला”, असं ट्वीट तरण आदर्श यांनी केलं.

'मिशन मंगल' सलमान खानचाही रेकॉर्ड तोडला

'मिशन मंगल' हा सिनेमा 15 ऑगस्टला प्रदर्शित झाला. यापूर्वी स्वातंत्र्य दिनाला प्रदर्शित झालेल्या सिनेमांमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमाचा रेकॉर्ड अभिनेता सलमान खानच्या 'एक था टाइगर'च्या नावे होता. सलमान-कटरीनाच्या या अॅक्शन पॅक्ड सिनेमाने 198.78 कोटी कमवले होते. मात्र, 200 कोटी कमवून 'मिशन मंगल'ने हा रेकॉर्ड तोडला आहे.

'मिशन मंगल' या सिनेमात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या मंगळ मोहिमेची खरी कहाणी दाखवण्यात आली आहे. या सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता शरमन जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं आहे. या सिनेमाला क्रिटीक्सनेही चांगला रिस्पॉन्स दिला.

संबंधित बातम्या :

Chandrayan Anthem : ‘इतिहास रचाएंगे, अंतरिक्ष में तिरंगा लेहराएंगे’, इस्रोसाठी खास गाणं

Bigg Boss-13 : ‘बिग बॉस आदेश देत आहेत…’ बिग बॉसच्या घरात आता महिलेचा आवाज!

#MeToo च्या आरोपीसोबत काम न करण्याच्या निर्णयावर यूटर्न, तनुश्रीचा आमीरवर निशाणा

Akshay Kumar Birthday : चाहत्यांना रिटर्न गिफ्टमध्ये अक्षयकडून फीटनेस मंत्र

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें