Bigg Boss-13 : ‘बिग बॉस आदेश देत आहेत…’ बिग बॉसच्या घरात आता महिलेचा आवाज!
यंदाच्या बिग बॉसमध्ये बिग बॉसच्या आवाजासोबतच पहिल्यांदा एका महिला बिग बॉसचा आवाजही घुमणार आहे. जर असं झालं, तर ती महिला बिग बॉसच्या इतिहासातील पहिली महिला बिग बॉस असेल.

मुंबई : ‘बिग बॉस सीझन-13‘ हे अत्यंत रंजक आणि खास असणार आहे (Bigg Boss-13). प्रेक्षकांना यंदाच्या बिग बॉसच्या पर्वात अनेक बदल पाहायला मिळतील. या कार्यक्रमाच्या थीम आणि कॉन्सेप्टला आणखी रंजक बनवण्यासाठी मेकर्स खूप मेहनत करत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, यंदाच्या बिग बॉसमध्ये बिग बॉसच्या आवाजासोबतच पहिल्यांदा एका महिला बिग बॉसचा आवाजही घुमणार आहे (Female Bigg Boss Voice). जर असं झालं, तर ती महिला बिग बॉसच्या इतिहासातील पहिली महिला बिग बॉस असेल. त्यामुळे यंदाचा पर्व हा आधीच्या तुलनेत अधिक रंजक असणार आहे.
High speed dhamaka aur celebrities ke glamour ka tadka! Sab hoga iss season on @biggboss along with @Vivo_India @BeingSalmanKhan@SurbhiJtweets @karan009wahi #BB13 #BiggBoss13 #BiggBoss
Anytime on @justvoot pic.twitter.com/tHx7A5K9Qg
— Bigg Boss (@BiggBoss) August 31, 2019
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओरिजिनल बिग बॉसचा आवाज असलेले अतुल कपूर (Bigg Boss Original Voice) यांना एक महिलाही या कार्यक्रमात साथ देणार आहे. कंटेस्टेंट्सला बिग बॉस मेल आणि फिमेल अशा दोन्ही आवाजांमध्ये सूचना मिळतील. फिमेल बिग बॉस ही कंटेस्टेंट्सना कमांड देईल, असाही दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, अद्याप यावर कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दूसरीकडे, या कार्यक्रमाचा होस्ट आणि अभिनेता सलमान खानसोबत (Salman Khan) एक-महिला होस्ट देखील ‘बिग बॉस’ मध्ये दिसेल, अशीही माहिती आहे. ही महिला होस्ट कोण असेल, याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही. मात्र, गेल्या पर्वातही सलमान खानसोबत महिला होस्ट असेल, असा दावा करण्यात आला होता. यासाठी अभिनेत्री कॅटरिना कैफचं नाव आघाडीवर होतं. मात्र, हा दावा खोटा ठरला.
Television ka blockbuster lekar aa rahe hain the one and only @beingsalmankhan! Are you ready for #BiggBoss13 with a twist that’s super tedha? @vivo_india #BB13 @BiggBoss coming soon!
Anytime on @justvoot pic.twitter.com/1v9nOehy48
— COLORS (@ColorsTV) September 7, 2019
त्यानंतर आता 13 वं पर्व सुरु होण्यापूर्वीदेखील अनेक दावे केले जात आहेत. बिग बॉस फॅनक्लबच्या अकाउंट्सवर रोज नवे अपडेट्स समोर येत आहेत. आता वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये केले जाणारे हे दावे किती खरे ठरतात हे तर बिग बॉस-13 सुरु झाल्यावरच कळेल.
‘बिग बॉस-13’ येत्या 29 सप्टेंबरपासून सुरु होईल, अशी चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या कार्यक्रमाला यंदाही सलमान खान होस्ट करेल. ‘बिग बॉस-13’ च्या ग्रँड प्रीमिअर एपिसोडमध्ये अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या नवीन ‘छप्पन छुरी’ या गाण्यावर परफॉर्म करणार आहे.
संबंधित बातम्या :
Bigg Boss Marathi 2 | शिव ठाकरे बिग बॉस 2 चां विजेता
Bigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्विस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज
बिचुकले, तुम्ही ‘हिंदी बिग बॉस’मध्ये या, सलमान खानचं आमंत्रण
