Bigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज

हिंदी बिग बॉसचा 13 (Bigg Boss 13) वा सिझन लवकरच सुरु होणार आहे. बिग बॉस हिंदीचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

Bigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज

Bigg Boss 13 मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चाहते असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस (Bigg Boss). मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ, बंगाली अशी विविध भाषांमध्ये बिग बॉस प्रसारित होतो. हिंदी बिग बॉसचा 13 (Bigg Boss 13) वा सिझन लवकरच सुरु होणार आहे. बिग बॉस हिंदीचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. मात्र बिग बॉसला कधी सुरुवात होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

कलर्स टीव्हीने प्रदर्शित केलेल्या या टीझरमध्ये हिंदी बिग बॉसचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) स्टेशन मास्तरच्या रुपात दिसत आहे. सलमान खान हा एका सुपरफास्ट चालत्या ट्रेनमध्ये बसलेला दिसत आहे. या ट्रेनच्या वेगावरुन यंदाच्या बिग बॉसमध्ये जबरदस्त ट्व‍िस्ट असेल असे दिसत आहे.

बिग बॉस 13 च्या या टीझरवरुन यंदाच्या हिंदी बिग बॉसमध्ये फक्त सेलिब्रिटी असणार आहेत. विशेष म्हणजे यंदा बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना चार आठवड्यात फायनलमध्ये दाखल व्हावे लागणार आहे. मात्र त्यानंतर ही सेलिब्रिटीमध्ये फायनलमध्ये पोहोचण्याची शर्यत सुरु राहणार आहे.

टीझरमध्ये सलमान खान ट्रेनमध्ये बसलेला दिसणे हेही यंदाच्या बिग बॉसचा एक भाग असल्याचे बोललं जात आहे. दरवेळी प्रमाणे यंदाही घराचे इंटीरिअर हे एका स्पेशल थीमवर असण्याची शक्यता आहे.

कलर्स टीव्हीने प्रदर्शित केलेल्या टीझरमध्ये हा शो कधी सुरु होणार याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र सोशल मीडियावर हा शो 29 सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची जबरदस्त चर्चा रंगली आहे.

यंदाच्या बिग बॉसच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर चंकी पांडे, राजपाल यादव, करण पटेल, शिविन नारंग, करण वोहरा, टीना दत्ता, देबलीना, अंकिता लोखंडे या सारख्या कलाकारांचा नावे व्हायरल होत आहे.

बिग बॉस 13 चे शूटींग गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये होणार आहे. यापूर्वी बिग बॉसचे शूटींग लोणावळ्यात होत होते. मात यंदा हे ठिकाण बदलण्यात आले आहे. तसेच टीआरपीसाठी बिग बॉस 13 मध्ये बदल करण्यात आले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *