जवळपास 40 % डॉक्टर ब्लडप्रेशर चुकीचा तपासतात : सर्व्हे

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

लखनौ (उत्तरप्रदेश) : उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरचा त्रास अनेकांना असतो. ब्लड प्रेशर तपासण्यासाठी अनेकजण डॉक्टरकडे जातात. हल्ली छोट्या-मोठ्या दवाखान्यातही ब्लड प्रेशर तपासण्याचे मशीन उपलब्ध असते. या मशीनद्वारे अनेकजण डॉक्टरांकडून ब्लड प्रेशर किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र ब्लडप्रेशर व्यवस्थित तपासलं आहे की नाही याबाबत अनेकांना खात्री देता येत नाही. नुकतंच उत्तरप्रदेशातील किंग […]

जवळपास 40 % डॉक्टर ब्लडप्रेशर चुकीचा तपासतात : सर्व्हे
Follow us on

लखनौ (उत्तरप्रदेश) : उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरचा त्रास अनेकांना असतो. ब्लड प्रेशर तपासण्यासाठी अनेकजण डॉक्टरकडे जातात. हल्ली छोट्या-मोठ्या दवाखान्यातही ब्लड प्रेशर तपासण्याचे मशीन उपलब्ध असते. या मशीनद्वारे अनेकजण डॉक्टरांकडून ब्लड प्रेशर किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र ब्लडप्रेशर व्यवस्थित तपासलं आहे की नाही याबाबत अनेकांना खात्री देता येत नाही. नुकतंच उत्तरप्रदेशातील किंग जॉर्ज मेडीकल युनिव्हर्सिटीने (KGMU) केलेल्या सर्वेक्षणानंतर, जवळपास 42 टक्के एमडी डॉक्टरांना रुग्णांचे ब्लडप्रेशर व्यवस्थित तपासता येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर 38 टक्के एमबीबीएस डॉक्टरांना ब्लडप्रेशर कसे चेक करतात हेही माहित नसल्याचं उघड झालं आहे. केजीएमयूने केलेल्या या सर्वेक्षणानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

धावपळीच्या युगातं बदलतं हवामान, बदलती जीवनशैली, फास्टफूडचे अतिसेवन, दारु, सिगारेट या सर्व गोष्टींमुळे अनेकांना ब्लडप्रेशरचा त्रासाला सामोर जावं लागतं. रविवारी केजीएमयूतील फीजियलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर नरसिंह वर्मा यांनी ब्लडप्रेशरबाबत एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात देश-विदेशातील अनेक डॉक्टर सहभागी झाले होते. यावेळी या सर्व डॉक्टर आणि नर्सला ब्लड प्रेशर कसे तपासले जाते याचं प्रात्यक्षिक करण्यास सांगितलं. त्यात 42 टक्के एमडी डॉक्टर आणि 38 टक्के एमबीबीएस डॉक्टरांना ब्लड प्रेशर व्यवस्थित तपासता येत नसल्याचं सिद्ध झालं. विशेष म्हणजे केवळ 32 टक्के नर्सेसला ब्लड प्रेशर तपासता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यानंतर डॉक्टर नरसिंह यांनी ब्लड प्रेशर व्यवस्थित तपासण्याबाबत डॉक्टरांना काही टिप्सही दिल्या. कोणत्याही डॉक्टरांनी रुग्णाचे ब्लड प्रेशर चेक करताना हातावर कोणतेही कापड ठेऊ नका. तसंच रुग्णाला पाय क्रॉस करुन किंवा खुर्चीवर टेकून बसण्यास सांगू नका. कारण खुर्चीवर टेकल्यानं ब्लड प्रेशरमध्ये 5-10 अंकाचा फरक जाणवू शकतो. या फरकामुळे रुग्णाच्या उपचारात फरक पडू शकतो.

तसंच अनेकदा जास्त तापट किंवा तणाव घेणाऱ्या व्यक्तींना ब्लड प्रेशरचा त्रास असतो असा आपल्याकडे समज आहे. मात्र शांत दिसणाऱ्या व्यक्तींनाही ब्लड प्रेशरचा त्रास असतो. एक वस्तू असताना दोन वस्तू दिसणे, अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, अतिघाम येणे, धाप लागणे, पायाला सूज येणे यासारखी लक्षणे जर एखाद्या व्यक्तीला आढळली तर त्याने तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. असेही केजीएमयूतील फीजियलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर नरसिंह स्पष्ट केलं.