देशातील सक्षम महिलांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील एकमेव नवनीत राणांचा समावेश

फेम इंडिया मासिक आणि आशिय पोस्ट सर्व्हे यांनी नुकतंच देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर केली (List of 25 Indian empowered women) आहे.

देशातील सक्षम महिलांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील एकमेव नवनीत राणांचा समावेश
Follow us
| Updated on: Feb 21, 2020 | 2:59 PM

नवी दिल्ली : फेम इंडिया मासिक आणि आशिय पोस्ट सर्व्हे यांनी नुकतंच देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर केली (List of 25 Indian empowered women) आहे. यात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना पहिल्या पाचमध्ये स्थान मिळाले आहे. तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचाही या यादीत समावेश आहे.

आज महिलांना स्वतःचा दर्जा आहे. त्यांना त्यांच्या स्वत: च्या नावाने, कतृत्वाने ओळखले जाते. सर्व महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सक्षमपणे काम करत आहेत. अशा 25 सक्षम महिलांची यादी नुकतंच जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातून खासदार नवनीत राणा यांचे एकमेव नाव पाहायला मिळत आहे.

सक्षम महिलांच्या यादीत स्थान मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया (List of 25 Indian empowered women) दिली. त्यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, “आता जबाबदारी आणखी वाढली आहे. यापुढे मी महिलांसाठी खूप काम करेन. मी गेल्या 9 वर्षांपासून समाजसेवेत आहे. मला खासदार होऊन फक्त 10 महिने झाले. त्याची दखल घेतली गेल्याने पुढील काळात मी निश्चितच संसदेत महिलांचे प्रश्न जोमाने उचलेन. त्यांना न्याय देईन.”

“या सन्मानाने जबाबदारी अधिकच वाढविली आहे. खासदार होऊन फार कालावधी झालेला नाही. आणखी खूप काम करायचे आहे. अमरावतीकरांनी जो विश्वास आपल्यावर टाकला, तो सार्थकी ठरवण्याचा निश्चितच प्रयत्न करेन,” असेही नवनीत राणा म्हणाल्या.

दरवर्षी फेम इंडिया मासिक आणि आशिया पोस्ट सर्व्हे देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर करते. समाजातील स्थान, व्यक्तीचा प्रभाव, त्यांची प्रतिमा, त्यांचं उद्दिष्ट या सर्व बाबींचा विचार ही यादी जाहीर करताना केला जातो. यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील लोकांची मतं विचारात घेतली जातात. समाजसेवा, खेळ, पत्रकार, राजकारण, कला यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना या यादीद्वारे गौरवण्यात येते. ज्या व्यक्तींनी गेल्या वर्षभरात महिला सबलीकरण आणि देशसेवेसाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशा व्यक्तींचा या यादीत समावेश (List of 25 Indian empowered women) असतो.

सक्षम महिलांची यादी (List of 25 Indian empowered women) 

1. भानुमती नरसिम्हन – आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या अध्यक्षा 2. पी. व्ही. सिंधू – जागतिक बॅडमिंटनपटू 3. रुपा झा – बीबीसी इंडियाच्या अनेक भाषांच्या प्रमुख 4. महुआ मोइत्रा – तृणमूल कांग्रेसच्या खासदार 5. नवनीत राणा – महाराष्ट्रातील अपक्ष खासदार 6. स्वाती मालीवाल – दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा 7. रूहानी सिस्टर्स – कला क्षेत्र 8. मल्लिका नड्डा – हिमाचल प्रदेशात समाजसेवेत सक्रीय 9. रुबिका लियाकत – एबीपी न्यूजच्या निवेदक 10. सीमा राज – वरिष्ठ आइआरएस ऑफीसर 11. सोनिया सिंह – राज्यसभा टीव्ही आणि बिजनेस पत्रकार 12. सोनल गोयल – आइएएस अधिकारी 13. डॉ.हेमलता एस. मोहन – प्रख्यात शिक्षण आणि संस्कृत तज्ज्ञ 14. सीमा समृद्धि – सर्वोच्च न्यायालयाच्या वकील 15. शिवांगी – देशातील पहिली नौदल लेफ्टनंट 16. डॉ.बरखा वर्षा – बाल कल्याण आणि महिला सबलीकरण 17. तान्या शेरगिल – भारतीय सैन्याच्या कॅप्टन 18. योगिता भयाना – प्रख्यात समाजसेविका आणि बलात्कारविरोधी इन इंडिया चळवळीचे जनक 19. शीला ईरानी – पोलीस आयुक्त 20. निशि सिंह – नाद फाऊंडेशनच्या संस्थापक 21. सारिका बहेती – जल संरक्षण क्षेत्रात काम 22. कुमुद सिंह – संपादक 23. डॉ.मानसी द्विवेदी – कवयित्री 24. डॉ. शिखा रानी – चिकित्सा, समाजसेवा आणि साहित्यलेखन

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.