अभिनेता गोविंदा प्रचारासाठी आला पण उमेदवाराचे नाव विसरला… त्याने लोकांना जिंकले पण…

Maval Lok Sabha constituency: श्रीरंग बारणे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गोविंदाच्या हस्ते झालं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ज्यांच्या प्रचारासाठी गोविंदा आला, त्या बारणेंचे नावचं गोविंदाला माहीत नसल्याचे समोर आले.

अभिनेता गोविंदा प्रचारासाठी आला पण उमेदवाराचे नाव विसरला... त्याने लोकांना जिंकले पण...
पत्रकार परिषदेत अभिनेता गोविंदा सोबत श्रीरंग बारणे अन् आमदार उमा खापरे
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 9:50 AM

लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा तिसरा टप्पा पूर्ण झाला. आता चौथ्या टप्प्यासाठी रणधुमाळी जोरात सुरु आहे. राजकीय नेते प्रचारसभांच्या धडका लावत आहेत. त्याचवेळी राजकीय पक्षांशी संबंधित सेलिब्रेटीज प्रचार सभा अन् रोड शो करत आहेत. बॉलीवूड अभिनेता गोविंदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही महिन्यांपूर्वीच दाखल झाला. तो आता महायुतीच्या उमेदवारांसाठी निवडणूक प्रचार अन् रोड शो करत आहे. मावळ लोकसभा मतदार संघात गोविंदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आला होतो. त्यावेळी तो आला, त्याने पाहिले अन त्याने जिंकलं ही…असे झाले. पण तो कोणाच्या प्रचारासाठी आला हेच विसरला. अखेर भाजप आमदार उमा खापरे यांना त्यांना श्रीरंग बारणे यांचे नाव सांगावे लागले.

नाव घेताना अडखळला मग…

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रोड शोसाठी गोविंदा रविवारी मावळ लोकसभेत आला होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत गोविंदा उपस्थितांची नावं घेऊ लागला. पण ज्यांच्या रोड शो साठी तो आला, ते उमेदवार श्रीरंग बारणे त्यांच्या शेजारीच बसले होते. गोविंदा यांना त्यांचे नाव आठवत नव्हते. यामुळे अखेर भाजपच्या आमदार उमा खापरे यांना कानात त्यांचे नाव सांगावे लागले.

हे सुद्धा वाचा

हे दृश्य कॅमेरात कैद

गोविंदा यांना आमदार उमा खापरे कानात उमेदवाराचे नाव सांगत असतानाचे दृश्य माध्यमांच्या कॅमेरात कैद झाले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता उमेदवाराचे नाव लक्षात नसेल तर गोविंदाला बोलावून काय साध्य झालं? असा प्रश्न गोविंदाच्या उजव्या बाजूला बसलेल्या बारणे यांना नक्कीच पडला असेल. त्यांच्या चेहऱ्यावर तसाच काहीसा प्रश्न निर्माण झाल्याचं ही दिसून येत होतं.

गोविंदा अन् श्रीरंग बारणे

आता रंगली चर्चा

श्रीरंग बारणे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गोविंदाच्या हस्ते झालं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ज्यांच्या प्रचारासाठी गोविंदा आला, त्या बारणेंचे नावचं गोविंदाला माहीत नसल्याचे समोर आले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा चांगली रंगली आहे.

मावळमध्ये १३ मे रोजी मतदान

मावळ लोकसभेचं चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मावळात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर होणार आहे. दोन्ही उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू असून मावळच्या आखाड्यात कोणता उमेदवार बाजी मारेल हे ४ जूनला समजणार आहे. परंतु काळ्या मातीतील पैलवानांनी महाविकास आघाडीचे संजोग वाघिरे यांना पाठिंबा दिला आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.