महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवणार; धमकीचा एकच पॅटर्न, पोलिसांची धावाधाव

महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. यता जिल्हा न्यायालयांना धमकीचा एकच पॅटर्न पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांची एकच धावाधाव झाल्याचे दिसून आलं.

महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवणार; धमकीचा एकच पॅटर्न, पोलिसांची धावाधाव
life threat
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 2:40 PM

राज्यातील एकाच वेळी पाचहून अधिक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर पोलिसांची एकच धावाधाव झाली. एका अज्ञात व्यक्तीने ई-मेलच्या माध्यमातून धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पोलिसांनी जिल्हा न्यायालय परिसरात रिकामा केला. आता न्यायालयाला कोणी धमकी दिली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. आता पोलिसांनी न्यायालयाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

साताऱ्यात पोलिसांची धावाधाव 

Loading...

सातारा जिल्हा न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा अज्ञात ई-मेलद्वारे मिळाली. या गंभीर प्रकारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढून न्यायालयाची इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक  घटनास्थळी दाखल झालं आहे. सध्या संपूर्ण न्यायालय परिसराची कसून तपासणी सुरू आहे. सायबर पोलीस या धमकीच्या ई-मेलचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर मुंबईतील कोर्टात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर दिंडोशी कोर्टाची पोलिसांकडून झडती घेण्यात आली. पोलिसांच्या तपासणीत सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.

ठाणे, बीडमधील न्यायालयाला ई-मेलद्वारे धमकी 

ठाणे, हिंगोली, बीड जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी मिळाली. न्यायालयात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण न्यायालय रिकामे केले. पोलीसांकडून तपासणी सुरू आहे. या धमकीमुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापुरातही जिल्हा व सत्र न्यायालयाकडून बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.  सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवण्याचे धमकी मिळाली. सोलापुरातही ईमेल द्वारे ही धमकी देण्यात आली आहे.  धमकीचा मेल आल्यानंतर या ठिकाणी कोर्ट रिकामे करण्यात आले.

हिंगोलीतही खळबळ 

हिंगोली (Higoli) जिल्हा न्यायलयाला देखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात मेल आल्यानंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी परिसरात रिकामा करण्याचे आदेश दिले. त्यांतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसर रिकामा केला. घटनास्थळी पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी कोर्ट उडवून देण्याच्या धमकीचा मेल आल्यानंतर परभणीत देखील पोलीस बंदोबस्तात वाढ वाढवण्यात आला आहे. या सर्व न्यायालयांना अज्ञात मेलने धमकी मिळाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us