मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार बॉलिवूड अभिनेत्रींची सुटका

पोलिसांच्या समाजसेवा शाखेने काल (23 जानेवारी) रात्री कांदिवली येथील स्टारबक्स कॅफेमध्ये धाड टाकत सेक्स रॅकेटाचा पर्दाफाश (Bollywood Sex Racket) केला.

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार बॉलिवूड अभिनेत्रींची सुटका
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 10:56 AM

मुंबई : पोलिसांच्या समाजसेवा शाखेने काल (23 जानेवारी) रात्री कांदिवली येथील स्टारबक्स कॅफेमध्ये धाड टाकत सेक्स रॅकेटाचा पर्दाफाश (Bollywood Sex Racket) केला. या धाडीत पोलिसांनी बॉलिवूड आणि सीरियलशी संबंधित अभिनेत्रींसह चार मुलींची सुटका केली. तर एका पुरुषासह दोन महिलांना अटक करण्यात आली. कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास (Bollywood Sex Racket) करत आहेत.

23 जानेवारी रोजी संध्याकाळी कांदिवली येथील स्टराबक्स कॅफेत सेक्स रॅकेट संबंधित व्यवहार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाड टाकत तीन आरोपींना अटक केली. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी बिग बॉसमधील माजी स्पर्धक, तसेच बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टरलाही सेक्स रॅकेटमध्ये पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी पुन्हा बॉलिवूडमधील चार अभिनेत्रींची सेक्स रॅकेटमधून सुटका केली आहे. अटक केलेली अभिनेत्री अल्पवयीन असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, गोरेगाव येथेही काहीदिवसांपूर्वीच दोन बड्या अभिनेत्रींना सेक्स रॅकेटमधून अटक केली होती.