दोन तास ठप्प झालेली पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सुरळीत

जवळपास सव्वा तासापासून ठप्प झालेला पुणे-मुंबई रेल्वे मार्ग (Pune-Mumbai railway stop) आता सुरळीत झाला आहे. ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान बोगद्यामध्ये मोठा दगड पडल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली होती.

दोन तास ठप्प झालेली पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सुरळीत
| Edited By: | Updated on: Dec 10, 2019 | 11:27 PM

पुणे : जवळपास सव्वा तासापासून ठप्प झालेला पुणे-मुंबई रेल्वे मार्ग (Pune-Mumbai railway stop) आता सुरळीत झाला आहे. ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान बोगद्यामध्ये मोठा दगड पडल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली होती. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी येत ओव्हरहेड वायरचे काम दुरुस्त करुन रेल्वे सेवा सुरुळीत केली.

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प (Pune-Mumbai railway stop) झाल्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा परिणाम पडला. प्रगती एक्स्प्रेस कर्जत रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आली होती. यामुळे मुंबईहून पुण्याकडे येणारी सर्व वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्यानंतर खबरदारी म्हणून पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात आली. पण आता अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या प्रभावित गाड्या

1) कन्याकुमारी एक्स्प्रेस
2) प्रगती एक्स्प्रेस
3) डेक्कन क्वीन
4) सह्याद्री एक्स्प्रेस
5) हुबळी एक्स्प्रेस

ओव्हरहेड वायर बोगद्यामध्ये ज्या दगडाच्या भागाला बांधून ठेवली होती. तोच दगड पडल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली होती. पुणे-मुंबई वाहतूक सुरु होण्यासाठी अर्धातास लागेल. सध्या रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरु आहे, असं सांगण्यात येत होते.