राज्यासाठी दिलासादायक बातमी, उपराजधानी नागपूरची कोरोनामुक्तीकडं वाटचाल

| Updated on: Aug 09, 2021 | 11:50 AM

महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं कोरोना रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत.

राज्यासाठी दिलासादायक बातमी, उपराजधानी नागपूरची कोरोनामुक्तीकडं वाटचाल
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नागपूर : महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं कोरोना रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. नागपूर जिल्ह्यातील निर्बंध देखील कमी करण्यात आले आहेत.

10 पेक्षा कमी रुग्णांची नोंद

नागपूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे. सात दिवसांत जिल्ह्यात 10 च्या आत कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात शनिवारी एकही रुग्ण आढळला नाही तर रविवारी पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे. रविवारी 5070 चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये पाच जण पॅाझिटिव्ह आढळले आहेत.

174 सक्रिय रुग्ण

नागपूर जिल्हयात 174 सक्रिय रुग्ण आहेत त्यापैकी 128 कोरोना रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असल्याची माहिती आहे.

हॉटेलच्या वेळा वाढवण्याच्या निर्णयाचं स्वागत

नागपुरात हॉटेल, रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलीय. त्यामुळं हॉटेल व्यावसायिकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. त्यांना मोठा दिलासा मिळालाय. हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ वाढवून मिळावी यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यानंतर आजपासून हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलीय. मात्र, 50 टक्के क्षमता आणि कोविड नियमांचं पालन करावं लागणार आहे.

मनोरंजन क्षेत्रावरील निर्बंध शिथील करण्याची मागणी

नागपूरात हॉटेल, रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलीय. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांना याचा मोठा दिलासा मिळालाय. हॉटेल व्यावसायिकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. आता मनोरंज क्षेत्र आणि कलाकारांसाठी असलेले निर्बंध शिथील करावेत, अशी मागणी व्यापार बचाव संघर्ष समितीने केलीय. याबाबत संघर्ष समितीचे प्रमुख बिपेन अग्रवाल यांनी सरकारकडे निर्बंध शिथील करण्याची मागणी केलीय.

देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 4 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात 35 हजार 499 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 447 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 35 हजार 499 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 447 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 39 हजार 686 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

इतर बातम्या:

अंबरनाथमध्ये सर्वात मोठी लसीकरण मोहीम, 30 हजार कामगारांना दिली जाणार मोफत लस

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये चार हजारांनी घट, कोरोनाबळींचा आकडाही घटला

Nagpur move towards corona free only five cases recorded on 8 August