सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडेच नागपूर पोलिसांची शरीरसुखासाठी वेश्या पुरवण्याची मागणी

नागपूरमधील दोन पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडून तीन वेश्या आणि 35 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडेच नागपूर पोलिसांची शरीरसुखासाठी वेश्या पुरवण्याची मागणी
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 10:54 AM

नागपूर : नागपूरमधील दोन पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडून तीन वेश्या आणि 35 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागपूर शहरात पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच पोलीस दलातही एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही पोलिसांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

पोलीस उपनिरीक्षक दामोदर राजुरकर आणि पोलीस हवालदार शीतलाप्रसाद मिश्रा या दोघांना अटक केली आहे. हे दोघंही समाजिक सुरक्षा पथकात कार्यरत होते.

नागपूरमधील एका ठिकाणी एक महिला देह व्यापार चालवत होती, अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. यावर पोलिसांनी कारवाई करण्याचे सोडून त्यांनी थेट त्या महिलेकडे देह व्यापार सुरु ठेवण्यासाठी 35 हजार रुपये मागितले. विशेष म्हणजे या दोन पोलिसांनी शरीरसुखासाठी तीन वेश्यांचीही मागणी देह व्यापार चालवणाऱ्या महिलेकडे केली.

गेले काही दिवस नागपूर शहरातील गुन्हेगारीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. पण त्यातच पोलिसांच्या या कृत्याचा धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता  पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.