विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी नागपूर विद्यापीठाचा मोठा निर्णय

| Updated on: Feb 06, 2020 | 10:01 AM

कुठल्याही शैक्षणिक कार्यक्रमात जाण्यापूर्वी आता पोलीस विभागाच्या दामिनी पथकाला माहिती द्यावी लागणार (Nagpur university big decision for girl student) आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी नागपूर विद्यापीठाचा मोठा निर्णय
Follow us on

नागपूर : कुठल्याही शैक्षणिक कार्यक्रमात जाण्यापूर्वी आता पोलीस विभागाच्या दामिनी पथकाला माहिती द्यावी लागणार (Nagpur university big decision for girl student) आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सर्व महिविद्यालयांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. हिंगणघाटातील जळीतकांड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ज्या महाविद्यालयात कोणताही शैक्षणिक कार्यक्रम असेल तेथील आयोजकांनी दामिनी पथकाला याची माहिती देणे महत्त्वाचे आहे. त्यासोबत शैक्षणिक कार्यक्रमाला कोणत्या महाविद्यालयातील विद्यार्थी येणार आहेत त्या महाविद्यालयालाही दामिनी पथकाला माहिती द्यावी लागणार आहे.

नागपूर पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनाच्या संयुक्त बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करणे महाविद्यालयांना बंधनकारक असेल.

नुकतेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात एका शिक्षिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्यात आले. यामध्ये शिक्षिका जखमी झाली. याच पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापीठाने हा निर्णय घेतला.

पीडित शिक्षिकेची प्रकृती गंभीर

पीडित शिशिकेवर उपचार सुरु आहे. प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या प्रकरणी आरोपी विकी नगराळे याला अटक करण्यात आली असून त्याला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पीडितेचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून

हिंगणघाट येथील पीडित तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून केला जाणार आहे. नुकतंच याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

तसेच या प्रकरणी दोषीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या पीडितेव तरुणीवर योग्य ते उपचार करावेत, या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

एकतर्फी प्रेम प्रकरणातून शिक्षिकेवर हल्ला

एकतर्फी प्रेम प्रकरणातून पीडित शिक्षिकेला तिच्या गावात राहणाऱ्या तरुणाकूडन जिंवत जाळण्यात आले. हा तरुण दररोज तिचा पाठलाग करत होता. सोमवारी (3 फेब्रुवारी) पीडित शिक्षिका कामावर जात असताना तरुणाने मागून येऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि तिला जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.