नाना पाटेकरांच्या ‘नाम’चा तनुश्री दत्ताविरोधात 25 कोटींचा मानहानीचा दावा

| Updated on: Mar 13, 2020 | 4:14 PM

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Defamation Case Against Tanushree Datta) यांच्या 'नाम' संस्थेने अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात 25 कोटींचा मानहानीचा दावा केला आहे.

नाना पाटेकरांच्या नामचा तनुश्री दत्ताविरोधात 25 कोटींचा मानहानीचा दावा
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Defamation Case Against Tanushree Datta) यांच्या ‘नाम’ संस्थेने (Naam Foundation) अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात 25 कोटींचा मानहानीचा दावा केला आहे. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तनुश्री दत्ताला ‘नाम’ सामाजिक संस्थेविरोधात आरोप (Defamation Case Against Tanushree Datta) लावण्यापासून मज्जाव केला आहे.

‘नाम’ फाऊंडेशनकडून कोटींचा भ्रष्टाचार, तनुश्रीचा आरोप

तनुश्री दत्ताने नाम फाऊंडेशनवर (Defamation Case Against Tanushree Datta) गंभीर आरोप केले होते. “नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार केला. नाना पाटेकर यांनी नाम या संस्थेच्या नावाने परदेशातून कोट्यावधींच्या देणग्या घेतल्या. हा पैसा कुठे जातो? गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटायचा आणि फोटो काढायचं की यांचं काम झालं. ते कोल्हापूर पूरग्रस्तांना 500 घरं देणार होते, त्याचं काय झालं? कोणी जाऊन बघितलं”, असा आरोप तनुश्रीने केला होता.

‘नाम’ संस्थेचा तनुश्रीविरोधात मानहानीचा दावा

त्यानंतर ‘नाम’ संस्थेने (Naam Foundation) तनुश्रीविरोधात खटला (Defamation Case Against Tanushree Datta)दाखल केला होता. मात्र, या खटल्याच्या सुनावणीवेळी तनुश्री अनुपस्थित होती. तसेच, तिचे वकीलही वेळेवर न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यानंतर न्यायमूर्ती एके मेनन यांनी ‘नाम’ संस्थेला दिलासा दिला.

उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ‘नाम’ संस्थेने म्हटलं, “त्यांची संस्था दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी निरंतर काम करत आहे. मात्र, जानेवारी 2020 मध्ये तनुश्री दत्ताने एका पत्रकार परिषदेत त्यांच्या संस्थेवर आरोप केले. त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे.”

काय आहे प्रकरण?

2009 मध्ये आलेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या हिंदी चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरणावेळी नाना पाटेकर यांनी आपला विनयभंग केला, असा आरोप तनुश्रीने केला होता. 2018 मध्ये एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने नाना पाटेवर यांच्यावर विनयभंगांचा आरोप केला होता. हे प्रकारण पोलिसांपर्यंत पोहोचलं होतं. पण सबळ पुरावा नसल्यामुळे नाना यांना क्लीन चिट मिळाली होती.

केस बंद केल्याप्रकरणी तनुश्रीची उच्च न्यायालयात धाव

गेल्या वर्षी जूनमध्ये पोलिसांनी ही तक्रार खोटी असल्याचं सांगत प्रकरण बंद केलं होतं. मात्र, याविरोधात तनुश्रीने (Defamation Case Against Tanushree Datta) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सध्या प्रलंबित आहे.

संबंधित बातम्या :

नाना पाटेकर दुसरा आसाराम बापू, ‘नाम’च्या माध्यमातून कोट्यावधींचा भ्रष्टाचार : तनुश्री दत्ता

कोरिओग्राफर गणेश आचार्यंवर गुन्हा, डान्सर तरुणीला मारहाणीचा आरोप

#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी