दिवे पेटवण्यामागील मोदींच्या हेतूचं स्वागतच करायला हवं, रोहित पवार यांचा पाठिंबा

| Updated on: Apr 03, 2020 | 2:25 PM

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून रोहित पवारांनी आवाहन केलं. (Rohit Pawar supports PM Narendra Modi Candle Lighting)

दिवे पेटवण्यामागील मोदींच्या हेतूचं स्वागतच करायला हवं, रोहित पवार यांचा पाठिंबा
राज्यसभेत मंगळवारी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांचा निरोप समारंभ पार पडला. गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना मोदी भावूक झालेले दिसले.
Follow us on

मुंबई : दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं, अशा शब्दात शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी एकप्रकारे पाठिंबा दर्शवला आहे. (Rohit Pawar supports PM Narendra Modi Candle Lighting) आधी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी मोदींवर टीका केल्याने पक्षात दोन गट पडल्याचं चित्र आहे.

‘दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा. त्यासाठी कोणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही, रस्ते, गल्ली इथे जायचं नाही, सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पार करायची नाही, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

आव्हाड आणि मलिक यांची टीका

याआधी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर सडकून टीका केली होती. लोकांची चूल कशी पेटेल, यावर साहेब बोलतील, असं वाटलं होतं, मात्र त्यांनी दिवा पेटवण्याचा संदेश दिला, अशा शब्दात नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तर मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहे, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

आव्हाड आणि मलिक नेमकं काय म्हणाले? : वाचा

मोदी इव्हेंट करण्यात पटाईत, आव्हाड कडाडले, चूल पेटवण्याऐवजी दिवे पेटवण्याचा उपदेश, मलिक यांची खोचक टीका

(Rohit Pawar supports PM Narendra Modi Candle Lighting)