येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं प्रकाशाचा जागर, नरेंद्र मोदींच्या भाषणातील 9 मुद्दे

येत्या रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करा आणि मेणबत्ती, दिवा, टॉर्च, मोबाईल बॅटरी लावा (Narendra Modi asks to light a candle)

येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं प्रकाशाचा जागर, नरेंद्र मोदींच्या भाषणातील 9 मुद्दे

नवी दिल्ली : कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा. त्यासाठी कोणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही, रस्ते, गल्ली इथे जायचं नाही, सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पार करायची नाही, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. (Narendra Modi asks to light a candle)

नरेंद्र मोदींच्या भाषणातील 9 मुद्दे

1. 5 एप्रिलला प्रकाशाची शक्ती दाखवून देऊ 2. येत्या रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करा 3. दिवे बंद करुन मेणबत्ती, दिवा, टॉर्च, मोबाईल बॅटरी लावा 4. 9 मिनिटांनंतर एकेक दिवा लावताना प्रकाशाची शक्ती दिसेल 5. दिवे पु्न्हा लावताना संकल्प करा, आपण एकटे नाही 6. आपण 130 कोटी जनतेची शक्ती दाखवून देऊ 7. कोरोनाच्या अंधकारमय संकटावर प्रकाशाने मात करु 8. प्रकाशशक्ती दाखवताना एकत्र येऊ नका 9. सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच कोरोनाची साखळी तोडू या

Narendra Modi asks to light a candle

Published On - 9:30 am, Fri, 3 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI