मोठी बातमी! ख्रिसमस आणि नव्या वर्षाला फटाके फोडण्यासाठी फक्त 1 तास सूट

| Updated on: Dec 02, 2020 | 5:15 PM

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्येही रात्री 11:30 ते 12:30 अशी फक्त एका तासाची वेळ फटाके फोडण्यासाठी देण्यात आली आहे.

मोठी बातमी! ख्रिसमस आणि नव्या वर्षाला फटाके फोडण्यासाठी फक्त 1 तास सूट
Follow us on

नवी दिल्ली : नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (NGT) ने संपूर्ण देशभरात हेवेच्या खराब गुणवत्तेचा विचार करता आणि कोरोनाच्या जीवघेण्या धोक्यामुळे सर्व फटाक्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली आहे. पण या सगळ्यात ख्रिसमस आणि नवी वर्षाच्या स्वागतासाठी हवेची गुणवत्ता चांगल्या असणाऱ्या शहरांमध्येच फटाके फोडण्यास परवाणगी देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्येही रात्री 11:30 ते 12:30 अशी फक्त एका तासाची वेळ फटाके फोडण्यासाठी देण्यात आली आहे. (ngt extends ban on firecrackers across the country even delhi ncr 1 hour relax on christmas and new year)

खरंतर, वाढत्या हवा प्रदुषणामुळे अनेक शहरांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे एनजीटीने 9 नोव्हेंबरच्या रात्रीपासून ते 30 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके फोडण्यावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती. इतकंच नाही तर दिल्ली सरकारनेही फटाके फोडण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली होती.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब असलेल्या देशातील सर्व शहरांमध्ये फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी घालण्याचे निर्देशही एनजीटीचे मुख्य न्यायाधीश ए.के. गोयल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिले होते. अशात एकीकडे देशभरात कोरोनाचा धोका वाढत आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने खराब होत आहे. राज्यातही लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणाची पातळी घसरली असली तरी पुन्हा मिशन बिगीन अगेन सुरू झाल्याने प्रदूषण वाढू लागलं आहे. चंद्रपूर आणि घुगुस या दोन ठिकाणी सर्वाधिक प्रदूषणात वाढ झाल्याचं प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. या दोन शहरांसह राज्यातील 15 शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं या अहवालात आढळून आलं असून वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

चंद्रपुरात असलेल्या कोळसा खाणी आणि वीज केंद्राच्या प्रदुषणामुळे चंद्रपूरच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. कोरोना काळात उद्योग बंद असल्याने चंद्रपूरसह महाराष्ट्राच्या प्रदूषणात 30 ते 55 टक्क्याने घट झाली होती. जानेवारी ते मार्च 2020 प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात चंद्रपूर व घुगुस या दोन शहराचा औद्योगिक शहरे प्रदुषित क्षेत्राच्या यादीत झळकली आहे. (ngt extends ban on firecrackers across the country even delhi ncr 1 hour relax on christmas and new year)

सर्व प्रकारच्या वायू प्रदुषणात मुंबई आणि चंद्रपूर हे सर्वाधिक प्रदुषित विभाग ठरली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाचा सन 2019-20 या वर्षाचा अहवाल जाहीर झाला आहे. मार्च महिन्यात देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दरम्यानच्या, काळात महाराष्ट्रासह देशातील उद्योग बंद होते. रेल्वे, वाहतूक बंदी होती. त्यामुळं उद्योगांची चाकं थांबली. गाड्याची चाकं थांबली. यामुळे वातावरण ढवळून निघालं होतं.

इतर बातम्या – 

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त नागपूर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सायकलवारी!

थंडीत घसरता पारा, वाढते प्रदूषण, ‘AIIMS’ संचालकांना कोरोना संसर्ग वाढण्याची धास्ती

(ngt extends ban on firecrackers across the country even delhi ncr 1 hour relax on christmas and new year)