शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही : छगन भुजबळ

येत्या 26 जानेवारी रोजी सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी (No need aadhar card for Shivthali) आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही.

शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही : छगन भुजबळ
| Edited By: | Updated on: Jan 22, 2020 | 3:59 PM

मुंबई : येत्या 26 जानेवारी रोजी सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी (No need aadhar card for Shivthali) आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (No need aadhar card for Shivthali) यांनी दिली.

भुजबळ म्हणाले, “या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी आणि महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. ही भोजनालये दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत कार्यरत राहतील. या भोजनालयात दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची आहे.”

भोजनालय चालविण्यासाठी या मालकाकडे स्वत:ची पर्याप्त जागा असावी. भोजनालयात एका वेळी किमान 25 व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल. एका भोजनालयात किमान 75 आणि कमाल 150 थाळी भोजन उपलब्ध होणार आहे. या भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास आणि भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई आहे, असं भुजबळ म्हणाले.

शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येईल तेथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना या भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.