AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटे पहाटेच मृतदेहांचा खच, कंटेनर ट्रक बसला धडकला, पेटलेल्या बसमधील 17 प्रवाशांचा जळून मृत्यू, काहीच…

एक अतिशय हैराण करणारी आणि धक्कादायक घटना नुकताच घडली. तब्बल 17 प्रवाशांचा मृत्यू झाला अचानक झालेल्या अपघातानंतर बसला आग लागली आणि तब्बल 17 प्रवाशांचा मृत्यू झाला.

पहाटे पहाटेच मृतदेहांचा खच, कंटेनर ट्रक बसला धडकला, पेटलेल्या बसमधील 17 प्रवाशांचा जळून मृत्यू, काहीच…
Accident
| Updated on: Dec 25, 2025 | 8:29 AM
Share

चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर येथे एक धक्कादायक अपघाताची घटना घडली. बस आणि कंटेनर ट्रकचा अपघात होऊन लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला. हेच नाही तर मृतांच्या आकड्यात वाढ होऊ शकते, असेही सांगितले जात आहे. बस बंगळूरूहून गोकर्ण येथे जात होती तर कंटेनर ट्रक बंगळूरूला निघाला होता. कंटेनर ट्रक डिव्हायडरला धडकला आणि नंतर बसला धडकल्याने पहाटे हा मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयूरजवळ हा भीषण बस अपघात झाला. बस कंटेनर लॉरीवर आदळली आणि मोठी आग लागली. या अपघातात 17 प्रवासी जिवंत जळाले आणि कंटेनर ट्रक चालकाचाही घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतंय, यासोबतच अजूनही काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. या बसमध्ये एकून 32 प्रवासी प्रवास करत होते.

ही घटना राष्ट्रीय महामार्गावर घडली. धडकेनंतर काही कळताच बसला मोठी आग लागली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी बसमधील प्रवासी झोपले होते. कोणाला काही कळण्यापूर्वीच आगीचा भडका उडाला. आगीच्या घटनेबद्दल कळाताच बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

काही लोकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी आग विझवली आणि बचावकार्य केले. धडकेनंतर डिझेलची टाकी फुटल्यामुळे आग लागली. मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला असून जखमींवर उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत जाहीर करण्यात आली आहे.

हा अपघात इतका जास्त भयंकर होता की, काही कळण्याच्या आतच भडका उडाला. लोकांना बसमधून काढणेही शक्य झाले नाही. प्रशासनाकडून ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. या अपघाताची सखोल चाैकशी करण्याचे निर्देशही देण्यात आली आहेत. पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर हिरियूरजवळ बसची एका लॉरीला धडक झाली. या अपघाताची व्हायरल होणारी व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आलाय.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.