लक्षात ठेवा! 1 नोव्हेंबरपासून सिलेंडरच्या डिलिव्हरीचा नियम बदलणार

| Updated on: Oct 18, 2020 | 2:46 PM

1 नोव्हेंबरपासून घरगुती सिलेंडरची होणारी चोरी थांबवण्यासाठी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी तेल कंपन्या नवीन एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी प्रणाली लागू करणार आहेत.

लक्षात ठेवा! 1 नोव्हेंबरपासून सिलेंडरच्या डिलिव्हरीचा नियम बदलणार
Follow us on

नवी दिल्ली : प्रत्येक कुटुंबासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण तुमच्या घरी येणाऱ्या सिलेंडर संदर्भात नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता तुमच्या LPG सिलेंडरच्या होम डिलिव्हरीची प्रक्रिया (LPG Cylinder Home Delivery) पूर्वीसारखी नसणार आहे. कारण, पुढच्या महिन्यापासून डिलिव्हरी यंत्रणा बदलली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (now from 1 November lpg cylinder home delivery will need otp)

1 नोव्हेंबरपासून घरगुती सिलेंडरची होणारी चोरी थांबवण्यासाठी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी तेल कंपन्या नवीन एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी प्रणाली लागू करणार आहेत. ही नवीन प्रणाली काय आहे आणि होम डिलिव्हरी कशी होईल, जाणून घेऊयात…

– या नव्या नियमाला DAC असं नाव देण्यात आलं आहे. म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड. आता फक्त बुकिंगवरच सिलेंडरची घरी पोहोचणार नाही तर त्यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाइल नंबरवर आलेला कोडही पाठवावा लागणार आहे. जर तुम्ही डिलिव्हरी बॉयला कोड सांगितला नाही तर तुम्हा सिलेंडरही मिळणार नाही.

– जर एखाद्या ग्राहकाने वितरका (Distributor) ला मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर डिलिव्हरी बॉयकडे एक अॅप असेल ज्याने तुम्ही तुमचा नंबर क्षणात अपडेट करू शकता.

– अशा परिस्थितीत, ज्या ग्राहकांचा पत्ता चुकीचा आहे आणि मोबाईल नंबर चुकीचा आहे अशा ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. यामुळे सिलेंडरची डिलिव्हरीदेखील थांबवली जाऊ शकते.

– तेल कंपन्यां या प्रक्रियेला सगळ्यात आधी 100 स्मार्ट शहरांमध्ये लागू करणार आहे. जयपूरमध्ये याचा पायलट प्रोजेक्टही सुरू झाला आहे.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकल्पातून तेल कंपन्यांना 95 टक्क्यांहून अधिक फायदा झाला आहे. दरम्यान, ही सिस्टीम व्यावसायिक (commercial) सिलेंडरवर लागू होणार नाही.

इतर बातम्या – 

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, सोमवारपासून लागू होणार नवा नियम

महिन्याला 1 रुपयात मिळवा घसघशीत फायदा, जबरदस्त आहे सरकारची ही योजना

(now from 1 November lpg cylinder home delivery will need otp)