मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या दरात 30 रुपयांची घसरण, ग्राहकांना दिलासा

| Updated on: Oct 22, 2020 | 3:49 PM

नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये आज 125 गाड्यांची आवक झाली असून त्यापैकी 76 गाड्या भरुन कांदा दाखल झाला आहे.

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या दरात 30 रुपयांची घसरण, ग्राहकांना दिलासा
Follow us on

नवी मुंबई : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केटमध्ये घाऊक बाजारात आज 125 गाड्यांची आवक झाली असून त्यापैकी 76 गाड्या भरुन कांदा दाखल झाला आहे. त्यामुळे कांद्याचे दर काहीशा प्रमाणात कमी झाल्याचे पाहाला मिळाले. (Onion prices fall by Rs 30 in Mumbai APMC market, small relief to consumers)

गेल्या सात दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले होते. कांदा हा 80 ते 90 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. आज मार्केटमध्ये कांदा 60 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला उठाव नसल्याने कांद्याच्या दरात 30 रुपयांची घसरण झाली असल्याचे काही व्यापारी सांगतात.

30 वर्षांपासून कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले की, “काही व्यापारी अनधिकृतपणे कांद्याची साठवणूक करून दरवर्षी दसरा-दिवाळी सणाच्या वेळी कांद्याच्या दरात वाढ करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच शेतकऱ्यांकडून कमी दरात कांदा विकत घेऊन बाजारात जास्त दराने त्याची विक्री करत असतात”.

यामध्ये शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही, असेही तोतलानी यांनी सांगितले. कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करुन कांद्याचा भाव वाढवला जातो. शेतकऱ्याला मात्र चांगला दर मिळत नाही. परिणामी शेतकरी हा कंगाल तर व्यापारी मालामाल होत आहे.

सध्या मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या दरात 30 रुपयांची घसरण झाली असून 60 ते 70 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. तसेच नाफेड, इजिप्त, इराण या ठिकाणांहून आलेल्या कांद्यालादेखील उठाव नसल्याने हा कांदा बाजारात पडून आहे. इजिप्त आणि इराणमधून एकूण 50 टन कांदा आला असून हा कांदा 50 ते 60 रुपये किलोच्या दराने विकला जात आहे. परंतु बाजारात ग्राहक नसल्याने कांद्याला उठाव नाही.

आजचा कांद्याचा भाव किती?

नवीन कांदा : 20 ते 60 रुपये किलो
नाफेडवरून आलेला कांदा : 25 ते 50 रुपये किलो
इराण व इजिप्तवरून आलेला कांदा : 55 ते 60 रुपये किलो
मध्यप्रदेशमधून आलेला कांदा : 55 ते 60 रुपये किलो

संबंधित बातम्या

…म्हणून दिवाळीपर्यंत कांदा जाणार शंभरीच्या पार; जाणून घ्या ‘कारण’

Onion Hike | इराणचा 50 टन कांदा APMC मध्ये दाखल

हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्याने कांद्याच्या मागणीत वाढ

परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात, जेएनपीटी बंदरात 600 टन कांदा दाखल

(Onion prices fall by Rs 30 in Mumbai APMC market, small relief to consumers)