सूट-बूट घालून स्टाईलमध्ये हजेरी, लग्नसमारंभात चोरी करणारे स्टाईलिश चोर गजाआड

| Updated on: Feb 18, 2020 | 7:23 AM

पंचताराकिंत हॉटेलमध्ये लहान मुलांच्या सहाय्याने चोरी करणाऱ्या एका आतंरराज्यीय टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली (Theft in wedding nagpur) आहे.

सूट-बूट घालून स्टाईलमध्ये हजेरी, लग्नसमारंभात चोरी करणारे स्टाईलिश चोर गजाआड
Follow us on

नागपूर : पंचताराकिंत हॉटेलमध्ये लहान मुलांच्या सहाय्याने चोरी करणाऱ्या एका आतंरराज्यीय टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली (Theft in wedding nagpur) आहे. ही टोळी मोठ्या हॉटेलमधील लग्न समारंभात सूट-बूट घालून जायची. तेथे जाऊन लहान मुलांच्या मदतीने चोऱ्या करत होती. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त (Theft in wedding nagpur) केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी 7 गुन्हे उघडकीस केले आहेत.

नागपूरच्या रामदास पेठमधील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये लग्न समारंभ सुरु होता. यावेळी या टोळीने पाच लाखांचे दागिने असलेली बॅग चोरी केली होती. या प्रकरणातील दोन पुरुष आणि एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी मध्य प्रदेशातील असून लहान मुलांच्या मदतीनं ते चोऱ्या करायचे.

पंचतारांकित हॉटेल्स किंवा मोठ्या हॉलमध्ये होणाऱ्या मोठ्या लग्न समारंभात ही टोळी लहान मुलांसह सूट बूट घालून सहभागी व्हायची. त्या कुटुंबाचा एक भाग व्हायचे आणि मग संधी मिळताच लहान मुलांच्या माध्यमातून दागिन्यांची चोरी करायचे. चोरी केल्यानंतर तेथून पळ काढायचे.

ही टोळी वेगवेगळ्या शहरात जाऊन मोठे लग्न कुठे आहे याची माहिती घ्यायचे. त्यानंतर लग्नात सूट-बूट घालून अगदी परिवारातील लोकांप्रमाणे वावरायचे आणि संधी मिळताच लहान मुलाच्या मदतीने बॅग उचलायचे.ती बॅग मोठ्या व्यक्तीच्या हातात दिली की तो तिथून निघायचा. त्यामागे एकएक करून सगळेच बाहेर पडायचे. एका शहरात चोरी केली की मग ते शहर सोडून जायचे त्यांच्या टार्गेटवर मोठी शहरं होती.