पाकिस्तानात हालचाली वाढल्या, लष्कराची 3 वाजता पत्रकार परिषद

इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातही हालचाली वाढल्या आहेत. त्यातच पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक मेजर जनरल असिफ गफूर हे महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद होणार असून, पाकिस्तानातील सद्यस्थितीला उद्देशून ही पत्रकार परिषद असेल. थेट पाकिस्तानी लष्कराकडून पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याने भारतासह अवघ्या जगाचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले […]

पाकिस्तानात हालचाली वाढल्या, लष्कराची 3 वाजता पत्रकार परिषद
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातही हालचाली वाढल्या आहेत. त्यातच पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक मेजर जनरल असिफ गफूर हे महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद होणार असून, पाकिस्तानातील सद्यस्थितीला उद्देशून ही पत्रकार परिषद असेल. थेट पाकिस्तानी लष्कराकडून पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याने भारतासह अवघ्या जगाचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.

जम्म-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या सर्व पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावाचे झाले आहेत. याच दरम्यान पत्रकार परिषद होणार आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कराला भारताला निर्णायक उत्तर देण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर पत्रकार परिषदेतून काय भूमिका मांडतं, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

पाकिस्तान बिथरलं, युद्धाची तयारी सुरु, रुग्णालयांना पत्र

पुलावमा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. भारताकडून चहूबाजूंनी पाकिस्तानची नाकेबंदी सुरु आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय दबावाने पाकिस्तान पुरता बिथरला आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला भारत जरुर घेईल, या भीतीने पाकिस्तानने युद्धाबाबत तयारी सुरु केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत बैठक घेऊन, पाकिस्तानी सैन्याला भारताच्या हल्ल्यास तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर पाकिस्तानातील रुग्णालयांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं पत्र माध्यमात व्हायरल झालं आहे.

याशिवाय पाकिस्तानची इतकी घाबरगुंडी झाली आहे की त्यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि नियंत्रण रेषेजवळील गावांतील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. त्यासाठी खास नियमावली जारी केली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक प्रशासनाने रुग्णालयांना नोटीस पाठवली आहे. जर पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध झालं, तर मदतीसाठी सज्ज राहा, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.