जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार झाल्याची शक्यता

जेडीएसच्या दोन्ही नेत्यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. दोघांचेही जामीन अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आले आहेत. प्रज्वल यांनी अटकपूर्व जामिनासाठी आणि एचडी रेवन्ना यांनी अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती. एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार झाल्याची शक्यता
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 8:11 PM

H.D. Revanna : अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना हा सेक्स स्कँडल प्रकरणात देश सोडून फरार झाला आहे. रेवन्नाचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक प्रज्वल एचडी देवेगौडा यांच्या बंगळुरू येथील घरी पोहोचले होते. यानंतर एचडी रेवन्ना यांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपी नेत्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. प्रज्वल यांनी अटकपूर्व जामिनासाठी आणि एचडी रेवन्ना यांनी अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना आणि त्यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. प्रज्वलचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल झाले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल देशाबाहेर पळून गेला आहे. तो जर्मनीत असल्याचं बोललं जात आहे.

प्रज्वल रेवन्ना हे कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीएसचे विद्यमान उमेदवार देखील आहेत. त्यांच्या लोकसभा जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान झाले आहे. यानंतर त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले आणि तेव्हापासून तो लोकांसमोर आले नाहीत. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

होलेनरसीपूरचे खासदार एचडी रेवन्ना 1994 मध्ये या जागेवरून पहिल्यांदा आमदार झाले. 1999 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र 2004 मध्ये ते पुन्हा आमदार झाले. 2018 मध्येही ते मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन आमदार झाले. 2023 मध्येही ते जिंकले, पण त्यांचा पक्ष सत्तेवर येऊ शकला नाही. त्याच वेळी, प्रज्वल 2019 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.