राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी, पिंपरी चिंचवडमध्ये आयटी अभियंत्याची आत्महत्या

| Updated on: Apr 28, 2020 | 5:16 PM

प्रसून झा नामक 28 वर्षीय आयटी अभियंत्याने पुण्याच्या वाकडमधील राहत्या इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली (Pimpri Chinchwad IT Professional Suicide)

राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी, पिंपरी चिंचवडमध्ये आयटी अभियंत्याची आत्महत्या
Follow us on

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये आयटी अभियंता तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसून कुमार झा याने राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. (Pimpri Chinchwad IT Professional Suicide)

पुणे जिल्ह्यातील वाकड भागात असलेल्या लॉरेल सोसायटीत प्रसून कुमार झा सहाव्या मजल्यावर राहत होता. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे अनेक जण घरुन काम करत आहेत. प्रसून आपल्या दोन मित्रांसह आज सकाळी घरी होता.

सकाळच्या सुमारास इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी घेऊन प्रसूनने आत्महत्या केली. 28 वर्षीय प्रसून झा याचं नुकतंच लग्नही ठरलं असल्याची माहिती आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

प्रसून कुमार झा पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत होता. अचानक त्याने राहत्या इमारतीतून खाली उडी मारुन जीवन संपवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हेही वाचा : नागपुरात घरगुती वादातून मुलाकडून पित्याची हत्या

लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारीमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र राज्याच्या विविध भागातून हत्या-आत्महत्या अशा घटना समोर येत आहेत.

दोनच दिवसांपूर्वी नागपुरात घरगुती वादातून 25 वर्षीय तरुणाने आपल्या 55 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केली होती. नागपूरमधील हुडकेश्वर भागात ही घटना घडली होती. आरोपी मुलगा विक्रांत पिल्लेवान याला पोलिसांनी अटक केली.

घरातील सर्वजण टीव्ही बघत असताना विक्रांत अचानक हिंसक झाला होता. त्याने शेजाऱ्यांना शिवीगाळ केली, घरातील भिंतीवरही लाथा मारल्या. त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांना मारहाण करत त्याने चाकूने त्यांचा गळा चिरला होता.

(Pimpri Chinchwad IT Professional Suicide)