13 मे रोजी दिल्ली, 16 मे रोजी प्रयागराज उडवू, ‘जैश’च्या नावे धमकीचं पत्र, योगी-केजरीवालही रडारवर

नवी दिल्‍ली/ उत्तर प्रदेश : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना मिळालेल्या 2 पत्रांमध्ये ही धमकी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पत्रांवर जैश-ए-मोहम्‍मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख आहे. पत्र पाठवणाऱ्याने आपलं नाव मसूर अहमद असल्याचं म्हटलं असून, जैश संघटनेचा काश्मीर […]

13 मे रोजी दिल्ली, 16 मे रोजी प्रयागराज उडवू, 'जैश'च्या नावे धमकीचं पत्र, योगी-केजरीवालही रडारवर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

नवी दिल्‍ली/ उत्तर प्रदेश : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना मिळालेल्या 2 पत्रांमध्ये ही धमकी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पत्रांवर जैश-ए-मोहम्‍मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख आहे. पत्र पाठवणाऱ्याने आपलं नाव मसूर अहमद असल्याचं म्हटलं असून, जैश संघटनेचा काश्मीर कमांडर असल्याचा दावा  त्याने केला आहे.  या पत्रात रेल्वे स्टेशन आणि मंदिरही उडवण्याचा उल्लेख आहे.

सध्या पोलिसांनी या पत्रांची गंभीर दखल घेतली असून, त्याबाबत कसून चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांना मिळालेल्या या दोन्ही पत्रांतील मजकूर जवळजवळ सारखाच आहे. शामली आणि रुडकी रेल्वे स्‍टेशनवर या चिठ्ठ्या मिळाल्या. त्यात शामली आणि रुडकी रेल्वे स्टेशनसह वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर आणि अयोध्येच्या ‘राम जन्‍मभूमीवर’ हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.

“दोन्ही पत्रांचा तपास सुरु आहे. पत्र जिथून आले त्या ठिकाणांच्या चौकशीसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. कुणीतरी खोड करायची म्हणूनही मुद्दाम हे पत्र पाठवलेले असू शकते. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे”, असं पोलिसांनी सांगितलं.

एटीएसकडे तपास

उत्तर प्रदेशचे पोलीस महानिरिक्षक ओ.पी. सिंह म्हणाले, ” दहशतवादी पश्चिम उत्‍तर प्रदेशच्या अनेक रेल्वे स्‍टेशनला लक्ष्य करणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे. तसेच उत्तर प्रदेश, दिल्‍ली आणि हरियाणाच्या मंदिरांमध्येही हल्ल्याचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना आधीच झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यानंतर सुरक्षेची अधिक काळजी घेतली जाईल. संबंधित प्रकरण दहशतवादी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आले आहे. तसेच केंद्रीय गुप्तचर संस्थानाही याची माहिती देण्यात आली आहे”.

कधी आणि कुठे  हल्ल्याची धमकी?

पत्रात हल्ला कधी आणि कुठे करणार याचाही उल्लेख आहे. जैश-ए-मोहम्‍मद 13 मे रोजी शामली, बागपत, मेरठ, हापुड, गजरोला, गाझियाबाद, मुजफ्फरनगर, बरेली, दिल्‍ली, पानिपत आणि रोहतक रेल्वे स्‍टेशनवर स्फोट करु, अशी धमकी देण्यात आली आहे.  तसेच 16 मे रोजी प्रयागराजचा संगम, गाजियाबाद आणि दिल्‍लीचे हनुमान मंदिर, वाराणसीचे काशी विश्‍वनाथ मंदिर आणि अयोध्‍या राम जन्‍मभूमीवर हल्ला करणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे. यात वेगवेगळ्या बसस्थानकांवरही हल्ल्याचा उल्लेख आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.