जळगावातील उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पोलिसांकडून उच्चभ्रू वस्तीतील अपार्टमेंटमध्ये सुरु असेलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात (Jalgaon sex racket) आला आहे.

जळगावातील उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 10:58 AM

जळगाव : उच्चभ्रू वस्तीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरु असेलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात (Jalgaon sex racket) आला आहे. हे रॅकेट जळगावमधील पिंप्राळा भागातील सेंट्रल बँक कॉलनीमध्ये सुरु होते. या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारासह पोलिसांनी 6 जणांना ताब्यात (Jalgaon sex racket) घेतले आहे.

जळगाव येथील उच्चभ्रू भागात सेक्स रॅकेट चालवणारी महिला स्वतःचे खरे नाव लपवून खोट्या नावाने अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती. येथे ती काही महिलांसोबत देहविक्रीचा व्यवसाय चालवत होती. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून अपार्टमेंटमध्ये छापा टाकला.

छापा टाकल्यानंतर पोलिसांनी व्यवसाय चालवणारी मुख्य महिला तसेच इतर महिला आणि ग्राहक अशा एकूण 6 जणांना रामानंद पोलिसांनी ताब्यात घेतले.

उच्चभ्रू वस्तीत अशाप्रकारे देहविक्रीचा व्यापार उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. देहविक्रीचा व्यापार करणारी मुख्य महिला सूत्रधार ही मोठ्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे बोललं जात आहे. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर बनावट नावाने महिलेने हा फ्लॅट भाड्याने घेतला असल्याचे उघड झाले. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून या दिशेने पोलीस तपास करत आहे.