AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर

Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप… वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर

| Updated on: Jun 25, 2026 | 12:09 PM
Share

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने दणका दिला. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. १ मे २०२६ रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता.

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने दणका दिला. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. १ मे २०२६ रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता. प्राथमिक तपासात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला होता आणि नंतर तिचा निर्घृण खून केला होता. त्याने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला होता. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी भीमराव कांबळे याला पकडण्यात आले होते. आज कोर्टात याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात असून आरोपी भीमराव कांबळे हाच दोषी असल्याचं सिद्ध झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना याप्रकरणी बाराशे पानांची चार्जशीट तयार करावी लागली होती, ज्यामुळे सर्व माहिती कोर्टासमोर आणण्यास मदत झाली.

या प्रकरणी कोर्टात काय घडेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता कोर्टात दोष सिद्ध झाल्यानंतर न्यायमूर्तींनी थेट आरोपीलाच विचारले, ‘तुला कोणती शिक्षा देऊ सांग… तू त्या दिवशी चिमुकलीसोबत किती भयंकर वागलास ते विचार कर आणि ठरव, अशा व्यक्तीला काय शिक्षा द्यावी?’ सरकारी वकिलाने केलेल्या मागणीनुसार, ‘आरोपीला मृत्युदंड द्यावा कारण तो तुरुंगात आणखी काही धक्कादायक करू शकतो’, अशी विनंती केली आहे. पुण्यातील या हादरवणाऱ्या प्रकरणी लवकरच निकाल लागण्याची शक्यता असून आरोपीला मृत्युदंड किंवा जन्मठेप अशी शिक्षा दिली जाऊ शकते.

Published on: Jun 25, 2026 12:09 PM

Follow Us