Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना

कोरोना विषाणू प्रादुर्भावाची लक्षणे आढळल्यास पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी (Pune Divisional commissioner On Corona) दिल्या.

Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना
| Updated on: Mar 14, 2020 | 5:02 PM

पुणे : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली (Pune Divisional commissioner On Corona) आहे. पुण्यात आतापर्यंत 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ‘कोरोनाʼच्या प्रतिबंधासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवली जाणार आहेत. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Pune Divisional commissioner On Corona) रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत कौन्सिल हॉल येथे डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विद्यापीठांचे कुलगुरु, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये, यासाठी प्रत्येकाने दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत

चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या 7 देशांचा प्रवास करुन आलेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन (विलगीकरण) करावे. या विद्यार्थ्यांनी स्वतः हून घरीच 15 दिवस स्वतंत्र रहावे. कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये, अशा सूचना म्हैसेकर यांनी केल्या.

परदेशातून आलेल्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार विलगीकरण कक्ष स्थापन करावा. मात्र या कक्षातील विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. परदेशातून प्रवास करुन आलेल्या पण खासगी ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे प्रशासनाला सादर करावी, जेणेकरून त्यांची माहिती ठेवणे प्रशासनाला सोयीस्कर होईल, असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.

Corona | मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, निवडणुकाही पुढे ढकलण्याची मागणी

विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक शिष्टाचार राखण्याबाबत प्रशिक्षित करुन शैक्षणिक संस्था परिसरातही स्वच्छता राहील, याची दक्षता बाळगा. विद्यार्थ्यांनी गर्दीत जाणे टाळावे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ औषधोपचार घ्यावा. सुटीच्या कालावधीत अनावश्यक बाहेर फिरु नये. कोरोना विषाणू प्रादुर्भावाची लक्षणे आढळल्यास पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी (Pune Divisional commissioner On Corona) दिल्या.