Corona | मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, निवडणुकाही पुढे ढकलण्याची मागणी

कोरोना आटोक्यात येण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी गुढीपाडव्याचा मेळावा रद्द केला (MNS Gudipadva melva Cancelled) आहे.

Corona | मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, निवडणुकाही पुढे ढकलण्याची मागणी
Follow us
| Updated on: Mar 14, 2020 | 5:47 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस (MNS Gudipadva melva Cancelled) वाढतं आहे. यामुळे जनतेने गर्दीची ठिकाण टाळा असे आवाहन सरकारकडून केलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द  करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृत पत्राद्वारे सर्व मनसैनिकांना याबाबतची माहिती दिली.

दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने (MNS Gudipadva melva Cancelled) मुंबईत शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्यासाठी मुंबईसह राज्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक शिवतीर्थावर येतात. मात्र कोरोनाची साथ जास्त पसरु नये, तसेच कोरोना आटोक्यात येण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी गुढीपाडव्याचा मेळावा रद्द केला आहे. राज्यातील नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.

“महाराष्ट्र सरकारने याबाबत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. पण त्या पुरेशा नाहीत. मॉल्स, थिएटर्स, जिम या गोष्टी बंद केल्या आहे. काही शहरात शाळाही बंद करायला सांगितल्या आहे. हे करणं योग्य असलं तरी फक्त चार-पाच शहरातील शाळा बंद करणं कसं पुरणार? मुंबईत प्रचंड गर्दीत रेल्वे आणि लोकलमधून लाखो लोक दाटीवाटीने प्रवास करतात. त्यावर काय उपाय ? राज्यात लाखो लोक बसेसमधून प्रवास करतात, एसटी स्टॅड्स मंडई, बाजा इथे लोक एकत्र येतात त्यावर काय करणार? ज्यांचं हातावर पोट आहे अशांना तर रोज गर्दीत प्रवास करावा लागणारच ना? मग त्याबाबत सरकारने काय ठरवलं आहे त्यावर उपाय का?” असे अनेक प्रश्नही मनसेने उपस्थित केले आहेत.

Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत

सरकारनंही उगाचं तोंडदेखले उपाय करण्यापेक्षा कोरोनाची साथ आटोक्यात येईलच अशी ठोस पावलं उचलावीत अशी आमची अपेक्षा आहे.

“येत्या चार-सहा आठवड्यात राज्यात काही निवडणुका आहेत. त्यात काही महानगरपालिकांच्याही निवडणुका आहेत. अशा निवडणुकांमध्ये बैठका होतात, मेळावे होताता, सभा होतात आणि मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करतात. कारण त्याशिवाय निवडणुकांचा अर्थच नाही. या निवडणुकाही सरकारने पुढे ढकलाव्यात. राज्य सरकार कदाचित कशातरी निवडणुका उरकून टाकण्याच्या मन: स्थितीत असेल पण तसं करणं योग्य नाही. अशाने लोकांच्या आरोग्यावर घाला तर येऊ शकतोच पण निवडणुकाही खुल्या वातावरणात होणार नाहीत. म्हणून या निवडणुकाही किमान सहा महिने पुढे ढकलाव्या,” अशी मागणी मनसेने केली आहे.

Corona Virus | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली

“कोरोनाच्या रुपाने जगावर आलेलं हे संकट लवकरात लवकर दूर होवोच. पण त्याआधीच आलेले आणि त्यानंतर भयानक झालेले आर्थिक संकटही टळो,” अशी प्रार्थना केली (MNS Gudipadva melva Cancelled) आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.