AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या रुग्णावर (Mumbai Corona Virus) संशंयित म्हणून हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते.

Corona Virus | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली
| Updated on: Mar 13, 2020 | 11:48 PM
Share

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Mumbai Corona Virus)आहे. नुकतंच मुंबई आणि अहमदनगरमधील प्रत्येकी एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 4 झाली आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19 वर पोहोचली आहे.

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या रुग्णावर (Mumbai Corona Virus) संशंयित म्हणून हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

अहमदनगर शहरात दुबई येथे जाऊन आलेला कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाला अहमदनगरच्या सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. या रुग्णांमध्ये अद्याप सर्दी, ताप, खोकला इत्यादी सारखे लक्ष आढळून आली नाही, अशी माहिती अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.

नागपुरात कोरोनाचे 3 रुग्ण

नागपुरात कोरोनाचे  (Nagpur corona positive) आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली होती. एकट्या नागपुरात कोरोनाचे एकूण 3 रुग्ण (Nagpur corona positive) झाले आहेत. पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आणखी दोघांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या रुग्णाची पत्नी आणि निकटवर्तीयालाही कोरोनाची लागण झाली. या तीनही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले . सहा दिवसांपूर्वी ही व्यक्ती अमेरिकेतून आली. या व्यक्तीच्या अहवालानुसार, त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज त्या व्यक्तीच्या संपर्कातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.

हेही वाचा : देशात कोरोनाचा दुसरा बळी, दिल्लीत 69 वर्षीय महिलेचा मृत्यू

कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार (WHO Declare Corona As Pandemic) म्हणून घोषित केलं आहे. ‘या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 4300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे याला जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणता येईल’, (WHO Declare Corona As Pandemic) असं WHO ने सांगितलं.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण

  • पुणे – 10
  • नागपूर – 3
  • मुंबई – 4
  • ठाणे – 1
  • अहमदनगर – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  1. पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  2. दाम्पत्याची मुलगी – 10 मार्च
  3. नातेवाईक – 10 मार्च
  4. टॅक्सी चालक – 10 मार्च
  5. मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  6. नागपुरात 1 – 12 मार्च
  7. पुण्यात आणखी एक – 12 मार्च
  8. पुण्यात 3 – 12 मार्च
  9. ठाण्यात एक – 12 मार्च
  10. मुंबईत एक – 12 मार्च
  11. नागपुरात 2 – 13 मार्च
  12. पुण्यात 1 – 13 मार्च
  13. अहमदनगर 1 – 13 मार्च
  14. मुंबईत एक – 13 मार्च

Follow Us
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल