AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात कोरोनाचा दुसरा बळी, दिल्लीत 69 वर्षीय महिलेचा मृत्यू

दिल्लीत कोरोना रुग्णाचा पहिला मृत्यू झाला (Delhi corona virus died) आहे. तर देशातील हा दुसरा मृत्यू आहे.

देशात कोरोनाचा दुसरा बळी, दिल्लीत 69 वर्षीय महिलेचा मृत्यू
| Updated on: Mar 13, 2020 | 11:15 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना रुग्णाचा पहिला मृत्यू झाला (Delhi corona virus died) आहे. तर देशातील हा दुसरा मृत्यू आहे. 69 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परदेशातून परतलेल्या मुलामुळे आईला संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील कुलबर्गी येथील 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (Delhi corona virus died) झाला होता. तो देशातील कोरोनाचा पहिला मृत्यू होता. त्यानंतर आता दिल्लीत कोरोनाचा दुसरा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘कोरोना’ व्हायरसने (Covid-19) भारतातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारतात ‘कोरोना’बाधितांची संख्या 76 वर पोहचली आहे. तर 16 कोरोनाग्रस्त हे भारत दौऱ्यावर असलेले इटालियन नागरिक आहेत.

महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली आहे. तर मुंबईत आतापर्यंत 4, पुणे 10, नागपूर 3, ठाणे 1 आणि नगरमध्ये 1 रुग्ण आढळले आहेत. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान आतापर्यंत भारतात 82 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 65 भारतीय, 17 परदेशातून भारतात स्थायिक झालेले रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 10 जणांना उपचार करुन सोडण्यात आलं आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला (Delhi corona virus died) आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगरमधील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

कोरोना व्हायरस संदर्भात शासनातर्फे अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे. यानुसार, “पुढील आदेशापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरातील जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याबाबतची माहिती दिली.

यात दहावी आणि बारावी परीक्षेच्या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड आणि पुणे या ठिकाणच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शाळा मात्र नियमित सुरु राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी (central government Holiday Notification fake)  सांगितले.

संबंधित बातम्या  

पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर

Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर

Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर

घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.