17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

चीनमध्ये 17 दिवसाच्या मुलीने कोरोनाला हरवलं (corona infected baby) आहे. त्यामुळे या मुलीची संपूर्ण जगात जोरदार चर्चा सुरु आहे.

सचिन पाटील

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 12, 2020 | 12:19 AM

बीजिंग : चीनमध्ये 17 दिवसाच्या मुलीने कोरोनाला हरवलं (corona infected baby) आहे. 5 फेब्रुवारी 2020 रोजी या चिमुरडीचा चीनमधील वुहान येथे जन्म झाला होता. तिचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईकडून तिला कोरोनाची लागण झाली होती. पण कोणत्याही औषधाविना तिने कोरोनावर मात करत बरी झाली. यानंतर या मुलीची संपूर्ण जगात जोरदार चर्चा सुरु आहे. सर्वांसाठी या चिमुरडीचं उदाहरण एक आशेचा किरण बनली (corona infected baby) आहे. चीनमधील मेल ऑनलाईन या वृत्तसंस्थेने याची माहिती दिली आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली. यानंतर काही काळातच 500 लोकांचा मृत्यू झाला. याचदरम्यान या चिमुरडीचा जन्म झाला. तिच्या आईला कोरोना झाल्यामुळे चिमुरडीलाही या आजाराची लागण झाली. चिमुरडीचा जन्म होताच तिला कोरोना या जीवघेण्या विषाणूशी झूंज द्यावी लागली. अवघे काही तास आधी जन्मलेली चिमुरडी जगेल की नाही याचीही डॉक्टरांना भीती होती. मात्र, चिमुरडीने कोरोनाशी यशस्वी झूंज दिली.

चिमुरडीला श्वास घेण्यात अडचण होत होती. त्यामुळे जन्मतःच डॉक्टरांनी तिला देखरेखीखाली ठेवले. जास्त त्रास होऊ लागल्यानं कोणत्याही प्रकारची औषधं तिला दिली गेली नाही. अखेर 15 दिवसांनंतर तिच्या श्वास घेण्यातील अडथळे दूर झाले. 2 दिवसांनंतर चिमुरडीला डॉक्टरांनी घरीही सोडले. एकीकडे कोरोनावर औषधं शोधण्यासाठी जगाची धडपड सुरु असताना 17 दिवसाची ही चिमुरडी कोणत्याही उपचाराविना बरी झाली.

ज्या देशात कोरोनाचा जन्म झाला त्याच चीनमध्ये जन्माला आलेल्या चिमुरडीला कोरोना झाल्यानंतर ती जगेल की नाही हा प्रश्न होता. पण असे असताना तिने कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनावर सगळ्यांनी भीती घेतलेली असताना जगासमोर हा एक आशेचा किरणच म्हणावा लागेल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें