Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर

Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर

कोरोनाची लागण झालेले मुंबईत दोन आणि पुण्यात आठ रुग्ण सापडले असतानाच, नागपुरातही एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे.

Nupur Chilkulwar

|

Mar 12, 2020 | 9:27 AM

नागपूर : कोरोनाची लागण झालेले मुंबईत (Nagpur Corona Patients) दोन आणि पुण्यात आठ रुग्ण सापडले असतानाच, नागपुरातही एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता अकरावर पोहोचली आहे. हा आकडा (Nagpur Corona Patients) चिंताजनक आहे.

अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पाच दिवसांपूर्वी ही व्यक्ती अमेरिकेतून आली. या व्यक्तीच्या अहवालानुसार, त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. या माहितीनंतर नागपूरकरांनी आता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

हेही वाचा : खोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स

कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार (WHO Declare Corona As Pandemic) म्हणून घोषित केलं आहे. ‘या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 4300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे याला जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणता येईल’, (WHO Declare Corona As Pandemic) असं WHO ने सांगितलं.

पुण्यात कोरोनाचे आठ रुग्ण

काल पुण्यात कोरोनाग्रस्त दाम्पत्यासोबत विमानात प्रवास करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली होती. तसेच, या दाम्पत्याला गाडीतून आणणाऱ्या ड्रायव्हरलाही या विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. पुण्यात दुबईहून आलेल्या दाम्पत्यानंतर त्यांच्यासोबतच्या आणखी तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं काल उघड झालं होतं. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज (Nagpur Corona Patients) वाढतानाच दिसत आहे.

कोरोनाने आता भारतासह महाराष्ट्रातही आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारही सज्ज झालं आहे.

11 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1,995 विमानांमधील 1,38,968 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सुचनेनुसार, सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या 3 विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

याशिवाय, बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे 21 फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून (Nagpur Corona Patients) एकूण 635 प्रवासी आले आहेत.

संबंधित बातम्या :

घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

Corona | कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

Corona | Pandemic म्हणजे नेमकं काय? जगभर पसरलेले दोन ‘पॅनडेमिक’ कोणते?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें