Corona | Pandemic म्हणजे नेमकं काय? जगभर पसरलेले दोन ‘पॅनडेमिक’ कोणते?

Corona | Pandemic म्हणजे नेमकं काय? जगभर पसरलेले दोन 'पॅनडेमिक' कोणते?

कांजिण्या, टीबी, एच1एन1, स्पॅनिश फ्ल्यू, मलेरिया, इबोल, झिका यासारख्या आजारांना आतापर्यंत 'पॅनडेमिक' ही संज्ञा वापरण्यात आली होती Corona Virus WHO Pandemic

अनिश बेंद्रे

|

Mar 12, 2020 | 8:16 AM

मुंबई : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘कोरोना विषाणू’ला ‘पॅनडेमिक’ घोषित करण्यात आलं आहे. Pandemic म्हणजे मोठ्या प्रदेशात पसरलेला साथीचा आजार. जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation) अशाप्रकारे आजारांची वर्गवारी करते. जगभरातील विविध देश किंवा खंडांमध्ये अशा आजाराची व्याप्ती असू शकते. मात्र, जगभरात या आजाराची किती रुग्णसंख्या आहे, किंवा किती जणांचे बळी गेले, त्यावरुन तो ‘पॅनडेमिक’ ठरत नाही. हिंदी भाषेत ‘महामारी’ असा शब्द सरसकटपणे वापरला जातो. (Corona Virus WHO Pandemic)

Pandemic घोषित करण्यासाठी संबंधित आजार संसर्गजन्य असणे आवश्यक आहे. कर्करोगाची व्याप्ती जगभरात आहे, परंतु हा साथीचा आजार नसल्यामुळे त्याला ‘पॅनडेमिक’ असे संबोधता येत नाही. सध्याच्या घडीला एचआयव्ही/एड्स आणि कोरोना व्हायरस (कोविड 19) हे दोन ‘पॅनडेमिक’ घोषित करण्यात आले आहेत.

कांजिण्या, टीबी, एच1एन1, स्पॅनिश फ्ल्यू, मलेरिया, इबोला, झिका यासारख्या आजारांना आतापर्यंत ‘पॅनडेमिक’ ही संज्ञा वापरण्यात आली होती. ‘प्लेग’ हा मानवी इतिहासातील सर्वात भयंकर ‘पॅनडेमिक’ ठरला होता.

जागतिक आरोग्य संघटनेने Pandemic चे सहा टप्पे स्पष्ट केले होते. त्यानुसार प्राण्यांच्या माध्यमातून याचा संसर्ग असल्याचं म्हटलं जात असे. परंतु आता हा निकष वापरला जात नाही.

(Corona Virus WHO Pandemic)

कोरोना व्हायरस (Coronavirus disease 2019 COVID-19) 

जानेवारी 2020 मध्ये चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा उगम झाला. कोरोना व्हायरसमुळे ‘तीव्र श्वसन रोग’ होतो. आतापर्यंत 100 देशांमध्ये कोरोना वायरस पसरल्याची नोंद आहे. मध्य चीन, इटली, दक्षिण कोरिया आणि इटली या देशांना मोठा फटका बसला आहे.

एचआयव्ही/एड्स

‘एचआयव्ही’चा उगम आफ्रिकेत झाला, मात्र 1966 ते 1972 दरम्यान तो अमेरिकेत पसरला. एड्स हा सध्या पॅनडेमिक घोषित करण्यात आलेला आहे. असुरक्षित लैंगिक संबंध आणि रक्तातून होणारा संसर्ग टाळल्यास ‘एड्स’पासून लांब राहता येते.

संबंधित बातम्या :

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

‘समाजानं वाळीत टाकलं’, कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांची तक्रार

Corona Virus WHO Pandemic

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें