Corona | कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 4300 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाे, त्यामुळे याला जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणता येईल

Corona | कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा
Follow us
| Updated on: Mar 12, 2020 | 11:21 AM

जिनीवा : जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार (WHO Declare Corona As Pandemic) म्हणून घोषित केलं आहे. ‘या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 4300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे याला जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणता येईल’, (WHO Declare Corona As Pandemic) असं WHO ने सांगितलं.

कुठल्याही आजाराला Pandemic म्हणून तेव्हा घोषित केलं जातं, जेव्हा तो आजार एकापेक्षा जास्त देशांमध्ये पसरतो. तो आजार जीवघेणा ठरतो. गेल्या काही दिवसात जगभरात या कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला आहे.

हेही वाचा : Corona | पुढचे 15 ते 20 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे : उद्धव ठाकरे

केरोना विषाणूला Pandemic घोषित करण्याच्या संबंधी WHO चे प्रमुख टेड्रोस अदनोम यांनी पत्रकारांना सांगितलं, “WHO या प्राणघातक विषाणूच्या प्रादुर्भावाचे मूल्यांकन करत आहे. आम्ही त्याच्या धोकादायक प्रमाणात प्रसार आणि निष्क्रियतेचा घातक स्तर या दोन्हीबाबत चिंतीत आहोत. (WHO Declare Corona As Pandemic) आमच्या मूल्यांकनानुसार, #COVID19 ला जगभरात परसलेला साथीचा आजार (Pandemic) म्हणून ओळखलं जाईल. आमचं काम लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आहे. कोरोना विषाणूच्या आर्थिक आणि सामाजिक प्रभावाला कमी करण्यासाठी आम्ही अनेकांसोबत मिळून काम करत आहोत.”

Pandemic म्हणजे काय?

Pandemic घोषित करण्यासाठी संबंधित आजार संसर्गजन्य असणे आवश्यक आहे. कर्करोगाची व्याप्ती जगभरात आहे, परंतु हा साथीचा आजार नसल्यामुळे त्याला ‘पॅनडेमिक’ असे संबोधता येत नाही. सध्याच्या घडीला एचआयव्ही/एड्स आणि कोरोना व्हायरस (कोविड 19) हे दोन ‘पॅनडेमिक’ घोषित करण्यात आले आहेत.

कांजिण्या, टीबी, एच1एन1, स्पॅनिश फ्ल्यू, मलेरिया, इबोला, झिका यासारख्या आजारांना आतापर्यंत ‘पॅनडेमिक’ ही संज्ञा वापरण्यात आली होती. ‘प्लेग’ हा मानवी इतिहासातील सर्वात भयंकर ‘पॅनडेमिक’ ठरला होता.

कोरोना व्हायरस (Coronavirus disease 2019 COVID-19) 

जानेवारी 2020 मध्ये चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा उगम झाला. कोरोना व्हायरसमुळे ‘तीव्र श्वसन रोग’ होतो. आतापर्यंत 100 देशांमध्ये कोरोना वायरस पसरल्याची नोंद आहे. मध्य चीन, इटली, दक्षिण कोरिया आणि इटली या देशांना मोठा फटका बसला आहे.

जगभरात कोरोनाची दहशत

जगभरात कोरोना विषाणूमुळे हजारो लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. चीनमध्ये जन्मलेला कोरोना विषाणू सध्या जगाच्या प्रत्येक बेटावर पोहोचला आहे. यातून भारतही सुटू शकला नाही. आरोग्य मंत्रालयानुसार देशात आतापर्यंत कोरोना संशयितांची 60 प्रकरणं समोर आली आहेत.

भारतात 15 एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांच्या येण्यावर प्रतिबंध

कोरोनाच्या भीतीमुळे भारत जगापासून अलिप्त झाला आहे. भारताने सर्व देशांचे व्हिसा तात्पुरते रद्द केले आहेत. सामान्य परदेशीयांना भारतात येण्यास मनाई करण्यात आली आहे. उद्या रात्री 12 पासून परदेशीयांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 15 एप्रिलपर्यंत परदेशीयांसाठी भारतात प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

मात्र, राजनैतिक अधिकारी, संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिकारी यांना या आदेशातून वगळण्यात आलं आहे. जागतिक संघटनांच्या अधिकाऱ्यांना भारतात येता येणार आहे. शिवाय, व्हिसा फ्री देशांतली ये-जा सुद्धा 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, परदेशातून येणाऱ्या भारतीयांना 14 दिवस वेगळे ठेवलं जाणार आहे.

इटलीमध्ये कोरोनाचा हाहा:कार

कोरोना विषाणूचा सर्वात मोठा धोका हा इटलीला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत जवळपास 10,149 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर तब्बल 630 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर (WHO Declare Corona As Pandemic) इटलीमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

इटली शहर लॉक डाऊन

युरोपीय देश इटलीने कोरोनाला परसण्यापासून रोखण्यासाठी शहराला लॉक डाऊन केलं. म्हणजेच इटलीच्या नागरिकांवर कुठेही ये-जा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर आखाती देशांनी परदेशी नागरिकांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध घातला आहे.

संबंधित बातम्या :

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

‘समाजानं वाळीत टाकलं’, कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांची तक्रार

कोरोना इफेक्ट : अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीआधीच गुंडाळणार

Corona | मास्क आणि हॅन्ड वॉश रेशन दुकानातून द्या : चंद्रकांत पाटील

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.