AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, अहमदनगरमध्ये एकाला कोरोनाची लागण

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात कोरोनाचे  (Nagpur corona positive) आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Corona | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, अहमदनगरमध्ये एकाला कोरोनाची लागण
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Mar 13, 2020 | 10:23 PM
Share

नागपूर : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Ahmadnagar corona positive)आहे. नुकतंच अहमदनगरमधील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

अहमदनगर शहरात दुबई येथे जाऊन आलेला कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाला अहमदनगरच्या सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. या रुग्णांमध्ये अद्याप सर्दी, ताप, खोकला इत्यादी सारखे लक्ष आढळून आली नाही, अशी माहिती अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.

नागपुरात कोरोनाचे 3 रुग्ण

नागपुरात कोरोनाचे  (Nagpur corona positive) आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली होती. एकट्या नागपुरात कोरोनाचे एकूण 3 रुग्ण (Nagpur corona positive) झाले आहेत. पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आणखी दोघांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या रुग्णाची पत्नी आणि निकटवर्तीयालाही कोरोनाची लागण झाली. या तीनही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले . सहा दिवसांपूर्वी ही व्यक्ती अमेरिकेतून आली. या व्यक्तीच्या अहवालानुसार, त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज त्या व्यक्तीच्या संपर्कातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.

हेही वाचा : खोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स

कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार (WHO Declare Corona As Pandemic) म्हणून घोषित केलं आहे. ‘या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 4300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे याला जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणता येईल’, (WHO Declare Corona As Pandemic) असं WHO ने सांगितलं.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण

  • पुणे – 10
  • नागपूर – 3
  • मुंबई – 3
  • ठाणे – 1
  • अहमदनगर – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  1. पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  2. दाम्पत्याची मुलगी – 10 मार्च
  3. नातेवाईक – 10 मार्च
  4. टॅक्सी चालक – 10 मार्च
  5. मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  6. नागपुरात 1 – 12 मार्च
  7. पुण्यात आणखी एक – 12 मार्च
  8. पुण्यात 3 – 12 मार्च
  9. ठाण्यात एक – 12 मार्च
  10. मुंबईत एक – 12 मार्च
  11. नागपुरात 2 – 13 मार्च
  12. पुण्यात 1 – 13 मार्च
  13. अहमदनगर 1 – 13 मार्च

संबंधित बातम्या  

पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर

Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर

Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर

घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

Corona | कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

Corona | Pandemic म्हणजे नेमकं काय? जगभर पसरलेले दोन ‘पॅनडेमिक’ कोणते?

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!