AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या भीतीनं हापूस आंब्याच्या परदेश निर्यातीला फटका, शेतकरी चिंतेत

कोरोना विषाणूच्या दहशतीने जगभरात थैमान घातलं आहे. याच कोरोनाच्या दहशतीखाली सध्या फळांचा राजा म्हणजेच हापूस आंबा पहायला मिळतोय (Corona effect on Hafoos Mango Export).

कोरोनाच्या भीतीनं हापूस आंब्याच्या परदेश निर्यातीला फटका, शेतकरी चिंतेत
| Updated on: Mar 14, 2020 | 3:26 PM
Share

रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या दहशतीने जगभरात थैमान घातलं आहे. याच कोरोनाच्या दहशतीखाली सध्या फळांचा राजा म्हणजेच हापूस आंबा पहायला मिळतोय (Corona effect on Hafoos Mango Export). मार्च महिन्यात याच फळांच्या राजाची परदेशवारी सुरु होते. मात्र, अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याने हवाई वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या परदेशवारीवर सक्रांत येण्याची चिन्हं आहेत. परदेशातून आंब्याचे व्यवहार करण्यासाठी येणारे खरेदीदारही कोरोनामुळं भारतात येणं टाळत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे परदेशात जाण्यासाठीची प्राथमिक बोलणीही झालेली नाही. त्यामुळे यावर्षी हापूस आंब्याची निर्यात अधिक तापदायक ठरणार आहे.

कोरोनाचा परिणाम विविध क्षेत्राला बसत असताना आता याचा फटका कोकणातील शेतकर्‍यांनाही बसण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या चक्रात अडकलेल्या आंब्याचा हंगाम यंदा दीड महिन्यांनी लांबणीवर गेला आहे. एप्रिलच्या अखेरपासून हापूसचे मोठ्या प्रमाणात उत्पादन बाजारात येणं सुरु होईल अशी शक्यता आहे. सध्या दिवसाला 4 हजार पेटी आंबा दररोज वाशी मार्केटला पाठवण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे उत्पादन कमी आहे.

वाशी मार्केटला कोकणातून जाणार्‍या एकूण आंब्यापैकी 40 टक्के मालाची निर्यात होते. त्यातील बहुतांश माल हा आखाती देशांमध्ये जातो. चीनमध्ये निर्माण झालेला कोरोना विषाणू संपूर्ण जगभरात पसरत आहे. बहुतांश देशांनी सुरक्षिततेसाठी परदेशी वाहतुकीवर नियंत्रण घातलं आहे. कुवेतसह दुबईला जाणाऱ्या विमान प्रवासात अडथळे येत आहेत. आंबा निर्यातीसाठी काही अंशी हवाईसेवेचाही वापर केला जातो. त्यामुळे वाशीमधून दुबईसह आखाती देशांना पाठवण्यात येणार्‍या आंब्यावर आपसुकच निर्बंध आले आहेत.

कोकणातल्या हापूस आंब्याच्या निर्यातीचं गणित

वाशी मार्केटप्रमाणे मार्च महिन्यात आखाती देशांमध्ये (गल्फ कन्ट्री) आंब्याची निर्यात केली जाते. त्यासाठी 20 मार्चनंतर युरोपीयन देशांमध्ये आंबा निर्यात होतो. कुवेत, कतार आणि साऊदी अरबसारख्या देशांसह युरोपीयन देशातही या आंब्याची निर्यात होते. इंग्लंडमध्ये सर्वात जास्त निर्यात होते. हवाई मार्गाने निर्यातक्षम आंबा काही तासात मोठ्या शहरांमध्ये पोहचतो. दुसरीकडे समुद्रसफारीच्या मार्गाने आंबा युरोपीयन देशांमध्ये जाण्यास अनेक दिवस लागतात.

सध्या आंबा निसर्गाच्या अनियमिततेच्या चक्रात अडकला आहे. त्यामुळे आंब्याचे उत्पादन दीड महिना लांबणीवर आहे. त्यामुळे सध्यातरी कोरोनाच्या धास्तीमुळे आंबा निर्यातीसंदर्भातील कुठलीच लगबग आंबा बागेत दिसत नाही. कोकणातून आंबा निर्यात होण्याआधी परदेशातून विविध खरेदीदार आंब्याचे व्यवहार करण्यासाठी येतात. पण सध्या असे खरेदीदार आंब्याची बोलणी करण्यासाठीही येत नाहीत. त्यांनाही कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती आहे. त्यामुळे परदेशातून आंब्याची बोलणी करणारे न आल्याने आंबा निर्यातीवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचं आंबा निर्यातदार सांगत आहेत.

कोरोनामुळे कुवेतसह आखाती देशांकडे जाणार्‍या हवाई वाहतुकीला लागलेला ब्रेक हापूस निर्यातीला तापदायक ठरु शकतो. त्यामुळे कोकणातील बागायतदारांना स्थानिक बाजारपेठांवरच लक्ष केंद्रीत करावं लागेल, असंच सध्य चित्र आहे.

Corona effect on Hafoos Mango Export

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.