भवानी पेठेत 78 रुग्ण, केवळ एक कोरोनामुक्त, पुण्यातील ‘कोरोना’ प्रादुर्भावाचा प्रभागनिहाय आढावा

पुण्यात कोरोनाचा फैलाव अजून वाढला असून काल एका दिवसात 41 नवे रुग्ण आढळले. (Pune Ward wise Corona free patients)

भवानी पेठेत 78 रुग्ण, केवळ एक कोरोनामुक्त, पुण्यातील कोरोना प्रादुर्भावाचा प्रभागनिहाय आढावा
| Updated on: Apr 14, 2020 | 8:55 AM

पुणे : पुण्यातील तब्बल पंधरा प्रभागांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील कोरोनामुक्त रुग्णांचा नकाशाच्या माध्यमातून लेखाजोखा मांडला आहे. 12 एप्रिलपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 28 रुग्णांचा आढावा घेण्यात आला आहे. (Pune Ward wise Corona free patients)

दहा प्रभागातील कोरोनाग्रस्त आता कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात सर्वाधिक कोरोनामुक्त रुग्ण धनकवडी-सहकारनगरमध्ये आहेत. ‘डेथ झोन’ ठरलेल्या भवानी पेठेत आतापर्यंत केवळ एका रुग्णाला डिस्चार्ज मिळाला आहे.

पुणे शहरातील 286 कोरोनाबाधित रुग्णांचाही नकाशाच्या माध्यमातून लेखाजोखा घेण्यात आला आहे. 13 एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या वास्तव्यावरुन हा आढावा घेतला आहे.

पुण्यात कोरोनाचा फैलाव अजून वाढला असून काल एका दिवसात 41 नवे रुग्ण आढळले. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 325 वर पोहोचली आहे. सोमवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून एकूण 31 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

वॉर्ड – ‘कोरोना’मुक्त संख्या 

औंध – बाणेर – 1
कोथरुड – बावधन – 1
सिंहगड रोड – 5
वारजे कर्वेनगर –1
शिवाजीनगर – घोलेरोड – 0
कसबा – विश्रामबागवाडा – 1
धनकवडी – सहकारनगर –9
भवानी पेठ – 1
बिवबेवाडी – 2
ढोले पाटील रोड – 2
येरवडा – धानोरी – 0
नगररोड – वडगावशेरी – 0
वानवडी – रामटेकडी – 0
हडपसर – मुंढवा – 0
कोंढवा – येवलेवाडी – 1
पुण्याबाहेरील रुग्ण – 4

पुण्यातील ‘भवानी पेठ’ कोरोनाचे ‘डेथ सेंटर’ ठरत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भवानी पेठ परिसरात सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असल्याने इथली रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. पुण्यात दगावलेल्या 34 पैकी 11 कोरोनाबाधित भवानी पेठेतील रहिवासी होते. भवानी पेठेतील कोरोनाग्रस्तांची संख्या एका दिवसात (13 एप्रिल) 9 ने वाढून 78 वर पोहोचली आहे. (Pune Ward wise Corona free patients)

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ)

औंध – बाणेर – 3
कोथरुड – बावधन – 1
सिंहगड रोड – 5
वारजे कर्वेनगर – 3 (+2)
शिवाजीनगर – घोलेरोड – 11
कसबा – विश्रामबागवाडा – 41 (+8)
धनकवडी – सहकारनगर – 18
भवानीपेठ – 78 (+9)
बिवबेवाडी – 11 (+1)
ढोले पाटील रोड – 39 (+8)
येरवडा – धानोरी – 17 (+1)
नगररोड – वडगावशेरी – 3
वानवडी – रामटेकडी – 15 (+5)
हडपसर – मुंढवा – 21
कोंढवा – येवलेवाडी – 8
पुण्याबाहेरील रुग्ण – 12