AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात विळखा घट्ट, भवानी पेठेत 56 कोरोनाग्रस्त, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?

भवानी पेठ परिसरात सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचं दिसत आहे. दोन दिवसात 16 रुग्णांची वाढ झाल्याने इथे 56 रुग्णसंख्या झाली आहे. (Pune Corona Patient Ward wise Division)

पुण्यात विळखा घट्ट, भवानी पेठेत 56 कोरोनाग्रस्त, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?
| Updated on: Apr 12, 2020 | 3:44 PM
Share

पुणे : राज्यावरील कोरोनाचं सावट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. पुण्यात आज (12 एप्रिल) दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 31 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील कोणत्या वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक  (11 एप्रिलपर्यंत) झाला आहे, याची माहिती महापालिकेने जारी केली आहे. भवानी पेठ परिसरात सर्वाधिक म्हणजे 56 रुग्ण सापडले आहेत. (Pune Corona Patient Ward wise Division)

पुण्यातील संगमवाडी परिसरातील 58 वर्षीय आणि सोमवार पेठेतील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्णांना कोरोनाशिवाय इतर आजारही जडलेले होते.

दरम्यान, भवानी पेठ परिसरात सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचं दिसत आहे. दोन दिवसात 16 रुग्णांची वाढ झाल्याने इथे 56 रुग्णसंख्या झाली आहे. कसबा-विश्रामबाग वाडा भागात 29, तर धनकवडी-सहकारनगरमध्ये 14 रुग्ण आहेत.

वॉर्ड – रुग्ण संख्या

औंध – बाणेर – 3 कोथरूड – बावधन – 1 सिंहगड रोड – 5 वारजे – कर्वेनगर – 1 धनकवडी – सहकारनगर – 14 कोंढवा – येवलेवाडी – 8 बिबवेवाडी – 8 हडपसर – मुंढवा – 21 वानवडी – रामटेकडी – 8 ढोले पाटील रोड – 28 भवानी पेठ – 56 कसबा – विश्रामबाग वाडा – 29 शिवाजीनगर – घोले रोड – 7 नगररोड – वडगावशेरी – 3 येरवडा – धनोरी – 9 पुण्याबाहेरील रुग्ण – 10

पुण्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे. पुण्याचा मृत्यूदर हा 11. 96% असून त्या तुलनेने जगाचा मृत्यूदर 5.97 टक्के आहे. (Pune Corona Patient Ward wise Division)

हेही वाचा : Corona | महाराष्ट्राची विभागणी रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये, कोणता जिल्हा कोणत्या विभागात?

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1895 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात आज 134 नवे रुग्ण आढळले. यापैकी सर्वाधिक म्हणजे 113 मुंबईत आढळले आहेत. तर मीरा-भाइंदरमध्ये 7, पुण्यात 4; नवी मुंबई, ठाणे, वसई-विरारमध्ये प्रत्येकी 2, तर रायगड, अमरावती, भिवंडी, आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. 14 एप्रिल नाही, तर किमान 30 एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन असणार आहे.

(Pune Corona Patient Ward wise Division)

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.