पुण्यात दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू, मृतांची संख्या 31 वर

राज्यासह देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. तसेच मुंबई आणि पुण्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Two corona women death in pune) आहे.

पुण्यात दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू, मृतांची संख्या 31 वर

पुणे : राज्यासह देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. तसेच मुंबई आणि पुण्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Two corona women death in pune) आहे. पुण्यात आज (12 एप्रिल) दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक असल्याचं (Two corona women death in pune) दिसून येत आहे.

पुण्यातील संगमवाडी परिसरातील 58 वर्षीय आणि सोमवार पेठेतील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्णांना कोरोनाशिवाय इतर आजारही जडलेले होते. पुण्यात दिवसेंदिवस कोरोना मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांबरोबर मृतांची संख्या ही राज्याच्या तुलनेत अधिक वाढत आहे. 100 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यातील मृतांचा आकडा पाहिला तर देशात सर्वाधिक मृत्यूदर पुणे जिल्ह्याचा असल्याचे दिसते.

पुण्यात शुक्रवारपर्यंत 209 बाधित रुग्णांपैकी 25 जणांचा मृत्यू झाला होता, हा आकडा महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांपेक्षा अधिक आहे. मुंबईत मृतांची संख्या सर्वाधिक असली तरी रुग्णांची संख्या अधिक असल्याने मृत्यूदर हा सहा टक्क्याच्या जवळपास आहे.

पुण्याचा मृत्यूदर हा 11. 96% असून त्या तुलनेने जगाचा मृत्यूदर 5.97 टक्के आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच मृतांचा आकडा वेगानं वाढत आहे. राज्यात सर्वाधिक 54 मृत्यू मुंबई तर 31 मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत.

दरम्यान, पुण्यात आतापर्यंत 239 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 31 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1700 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *